बारामतीमध्ये काल 39 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4937 वर गेली आहे.
बारामतीमध्ये काल 39 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4937 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (28/11/20) एकूण rt-pcr नमुने 227. एकूण पॉझिटिव्ह-14 . प्रतीक्षेत 23. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -09 त्यापैकी पॉझिटिव्ह -03. कालचे एकूण एंटीजन 129 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-22 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 14+03+22=39. शहर-21 . ग्रामीण- 18. एकूण रूग्णसंख्या-4937 एकूण बरे झालेले रुग्ण- 4448 एकूण मृत्यू– 128.
काल आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये बारामती तालुक्यातील एमआयडीसी येथील 50 वर्षीय पुरुष, बसस्थानकाशेजारील 49 वर्षीय पुरुष, आनंदनगर येथील 42 वर्षीय पुरुष, व्हिल कॉलनी येथील 45 वर्षीय महिला, खंडोबाची वाडी येथील 26 वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथील 63 वर्षीय पुरुष, वडगाव निंबाळकर येथील 60 वर्षीय महिला, सोमेश्वरनगर येथील 26 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 26 वर्षीय पुरुष, लाटे येथील 65 वर्षीय महिला, बारामती येथील 34 वर्षीय पुरुष, माळेगाव बुद्रुक येथील 52 वर्षीय पुरुष, मळद येथील 27 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये कन्हेरी येथील 50 वर्षीय पुरुष, ग्रीन पार्क बारामती येथील 25 वर्षीय पुरुष, जळोची येथील 35 वर्षीय पुरुष, बारामती येथील 33 वर्षीय महिला, वडगाव निंबाळकर येथील 65 वर्षीय पुरुष, मुरूम येथील 34 वर्षीय पुरुष, तांदुळवाडी येथील तीस वर्षीय पुरुष, मोतानगर येथील 19 वर्षीय महिला, मुरूम येथील 80 वर्षीय पुरुष, वाणेवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, खंडोबानगर येथील 45 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश होता.
पवार लॅबोरेटरी येथे परवा तपासलेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये संस्कृती रेसिडेन्सी टीसी कॉलेज रोड येथील 22 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 26 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आली आहे.
मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत हरिकृपा नगर देशपांडे इस्टेट येथील 47 वर्षीय पुरुष, महावीर पथ येथील 56 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, तांबे नगर येथील 44 वर्षीय पुरुष, भिगवण चौक महावीर भवन शेजारी 43 वर्षीय पुरुष, ढेकळवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, गोजुबावी जाधव वस्ती येथील 56 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.