बारामतीमध्ये काल 49 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 3334 वर गेली आहे.
![](https://baramatiwarta.in/wp-content/uploads/2020/09/image_search_1600738017615.jpg)
बारामतीमध्ये काल 49 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 3334 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (01/10/20) एकूण rt-pcr नमुने 167. एकूण पॉझिटिव्ह- 18. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल खाजगी प्रयोगशाळेमध्ये केलेले एकूण rt-pcr- 20 त्यापैकी पॉझिटिव्ह -06. कालचे एकूण एंटीजन 81. एकूण पॉझिटिव्ह-17 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 18+06+17=41. शहर-18 . ग्रामीण- 23. एकूण रूग्णसंख्या-3326 एकूण बरे झालेले रुग्ण- 2582 एकूण मृत्यू– 85. तसेच “काल माझे कुटुंब माझी जबाबदारी” या उपक्रमांतर्गत पिंपळी याठिकाणी ऍक्टिव्ह सर्वे करण्यात आला त्यामध्ये एकूण 46 संशयितांपैकी 38 जणांची अॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली त्यामध्ये 08 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत त्यामुळे बारामतीची रुग्ण संख्या 3326 + 8 = 3334 झालेली आहे.
बारामतीत काल शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये माळेगाव बुद्रुक येथील ३४ वर्षीय पुरूष, वडगाव निंबाळकर येथील ४३ वर्षीय महिला, सांगवी येथील ५९ वर्षीय पुरूष, हरीनिर्मलनगर येथील ५० वर्षीय पुरूष, आमराई येथील २७ वर्षीय महिला, संभाजीनगर येथील २८ वर्षीय महिला, म्हाडा कॉलनी येथील ३४ वर्षीय महिला, माळेगाव येथील १९ वर्षीय युवकाचा समावेश आहे.
बारामतीतील शासकीय रॅपीड अॅंटीजेन तपासणीत संभाजीनगर येथील ३९ वर्षीय पुरूष, कोऱ्हाळे बुद्रुक येथील २८ वर्षीय पुरूष, ३ वर्षीय मुलगी, ६५ वर्षीय महिला, रुई येथील ३० वर्षीय पुरूष, लिमटेक येथील ४० वर्षीय पुरूष, बारामती शहरातील ४० वर्षीय पुरूष रुग्णाचा अहवाल कोरोनाबाधित आला.
बारामतीत खासगी प्रयोगशाळा मंगल लॅबोरेटरीमध्ये तपासणी झालेल्या आरटीपीसीआर तपासणीत पवारवाडी येथील ५५ वर्षीय पुरूष, कटफळ येथील ७५ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
माळेगाव, शिवनगर येथील ५७ वर्षीय पुरूष, वाणेवाडी दत्तवाडी येथील ४२ वर्षीय पुरूष, भिगवण रोड रामचंद मुलुकचंदनगर येथील ३७ वर्षीय पुरूष, एमआयडीसी ग्रीन पार्क येथील २९ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीत खासगी मंगल लॅबोरेटरीमध्ये तपासलेल्या रॅपीड अॅंटीजेन नमुन्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये कोऱ्हाळे बुद्रुक येथील मतकरवस्तीतील ५८ वर्षीय पुरूष, वाणेवाडी गणेश मंदिर येथील ७० वर्षीय महिला, उंडवडी सुपे येथील ६९ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
सुपे गावठाण येथील ३९ वर्षीय पुरूष, कसबा येथील मुक्ती टाऊनशीप येथील ५० वर्षीय पुरूष, राजश्री बंगला आनंदनगर येथील ६५ वर्षीय पुरूष, ओंकार अपार्टमेंट सूर्यनगरी येथील ४० वर्षीय पुरूष, कृषीराज हॉटेल येथील ३३ वर्षीय पुरूष, सुमन रो हाऊस, जिवराजनगर येथील ४१ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.