बारामतीमध्ये कोरोना ने केला ४०० चा आकडा पार
एकूण 21 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामतीमध्ये कोरोना ने केला ४०० चा आकडा पार.
एकूण 21 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती ;वार्तापत्र
काल बारामती मध्ये एकूण 109 नमुने RT-PCL तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 42 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये 33 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून बारामती शहरातील नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे व उर्वरित 67 जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
बारामती शासकीय प्रयोगशाळेतील.
शहरातील पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भिगवन रोड येथील एक रुग्ण, ढवाण वस्तीतील एक रुग्ण, गुणवडी चौक येथील एक रुग्ण, कसबा येथील एक रुग्ण, अमराई येथील एक रुग्ण ,बारामती शहरातील तीन रुग्ण व भोई गल्ली येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील खाजगी प्रयोगशाळेतील.
प्रयोगशाळेमध्ये एकूण 35 जणांच्या नमुने अॅंटीजेन तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी बारामती शहरातील आठ रुग्ण व ग्रामीण भागातील चार रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे त्यामध्ये सिद्धेश्वर गल्लीतील एक, दूध संघ वसाहत येथील एक ,आमराई येथील 2 ,एमएसईबी कॉलनी येथील एक, मारवाड पेठ येथील एक,जळोची येथील एक व मार्केट यार्ड रोड आमराई येथील एक असे शहरातील आठ व माळेगाव येथील एक, पणदरे येथील एकाच कुटुंबातील दोन व मोरगाव येथील खाजगी रुग्णालयातील डॉक्टर असे एकूण 12 जणांचे एंटीजेन टेस्ट पॉझिटिव आलेली आहे.
त्यामुळे आज सकाळ पर्यंत बारामतीतील RT-PCL 9 व एंटीजेन 12 असे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत .
शहराच्या जवळपास सर्वच भागातून व सर्व स्तरातून नागरिक कोरोनाग्रस्त होत आहेत. यात दिलासा देणारी एकच बाब अशी आहे की पॉझिटीव्ह असलेल्या बहुसंख्य रुग्णांमध्ये लक्षणे आढळत नाहीत. बारामतीचा कोरोनाचा मृत्यूदर कमी करणे व कोरोनाचा प्रसार थांबविणे हीच सध्या प्रशासनापुढील दोन प्रमुख आव्हाने आहेत.
बारामती रुग्णसंख्या 406 झालेली आहे.
अशी वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ मनोज खोमणे यांनी दिली.