स्थानिक

बारामतीमध्ये कोविड-१९ प्रतिबंधक लस केंद्रांची संख्या वाढवण्याची सुनील सस्ते यांनी केली मागणी

जिल्हाधिकार्‍यांकडे लेखी पत्राद्वारे मागणी

बारामतीमध्ये कोविड-१९ प्रतिबंधक लस केंद्रांची संख्या वाढवण्याची सुनील सस्ते यांनी केली मागणी

जिल्हाधिकार्‍यांकडे लेखी पत्राद्वारे मागणी

बारामती वार्तापत्र
बारामती मध्ये कोविड-19 प्रतिबंधक लस देण्याबरोबरच जास्तीत जास्त नागरिकांच्या सहभागाकरिता केंद्रांची संख्या वाढवण्याची मागणी बारामती नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

राज्यात सर्वत्र कोविड-19 रोगाने थैमान घातलेले असून त्यावरील लसी संदर्भात शासनाच्या सूचनेनुसार शहरातील 45 वर्षांच्या वयोगटातील नागरिकांना लस देण्याचे धोरण सोयीचे होण्याकरिता बारामती नगर परिषदेच्या शाळा क्र. 3 , शाळा क्र.4 , व शाळा क्र.6 या शहरातील मध्यवर्ती ठिकाणी व भव्य पार्किंग व्यवस्था असणाऱ्या असून बारामती सारख्या जास्त लोकसंख्येच्या शहरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून जास्त नागरिक सहभागी घेतील व एकाच केंद्रावर जास्तीची गर्दी होणार नाही तसेच प्रशासनावर देखील ताण येणार नाही व नागरिकांची देखील सोय होईल याकरिता या ठिकाणी लसीकरण मोहीमेची सोय करावी अशा आशयाच्या लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!