बारामतीमध्ये पेन्सिल चौक मोकाट फिरणाऱ्या 71 जणांची केली कोरोना चाचणी,6 जण निघाले कोरोना बाधित
नागरिकांनी घरीच थांबून प्रशासनास मदत करावी असे आवाहन केले आहे.

बारामतीमध्ये पेन्सिल चौक मोकाट फिरणाऱ्या 71 जणांची केली कोरोना चाचणी,6 जण निघाले कोरोना बाधित
नागरिकांनी घरीच थांबून प्रशासनास मदत करावी असे आवाहन केले आहे.
बारामती वार्तापत्र
राज्यात कडक लॉकडाऊन लागू झाला असून आता प्रशासनाने देखील त्याची अंलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.या लॉकडाऊन च्या काळादरम्यान अत्यावश्यक कारणा व्यतिरिक्त इतरांना घर बाहेर पडता येणार नाही.मात्र असं असलं तरी आज बारामतीत काही लोक विनाकारण रस्त्यावर फिरत होते.आज बारामतीतील आरोग्य विभागाच्या तालुका पोलिसांनी आज रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरीकांची अँटीजेन टेस्ट केली असता 6 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.आज सकाळीच प्रशासनाने शहरातील पेन्सिल चौक येथे विनाकारणं फिरणाऱ्या 71 जणांची तपासणी केली असता त्यापैकी 6 पेन्सिल चौक येथे कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामती तालुका पोलीस स्टेशन,महेश ढवाण यांनी आज याची माहिती दिली. आज सकाळी 11 वाजल्यापासून बारामती शहरात पेन्सिल चौक ठिकाणी पोलिसांनी नाकेबंदी करून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची तपासणी केली. यामध्ये कारण नसताना उगाच फिरणाऱ्याना ताब्यात घेऊन, त्यांची तेथेच कोरोनाची चाचणी करण्यात आली. यामध्ये 6 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
यासंदर्भात ढवाण यांनी विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर अशीच कारवाई पुढील कालावधीत करण्यात येईल. तेव्हा नागरिकांनी घरीच थांबून प्रशासनास मदत करावी असे आवाहन केले आहे.
सदर पॉझिटिव्ह लोकांना प्रमाणपत्र देऊन सिल्वर जुबली हॉस्पिटल येथे उपचाराकरिता पाठवण्यात आलेले आहे.