बारामतीमध्ये भटक्या कुत्र्यांनी केला चिमुकलीवर हल्ला..
बारामतीमध्ये भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ...

बारामतीमध्ये भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीस चावा…
सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद….
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न जटील झाला आहे. अलिना इम्रान बागवान वय ( ७ ) या चिमुकलीस आज दि.२५ रोजी सायंकाळी तिच्या राहत्या घरासमोर खेळत असताना सहा ते सात भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून रक्तबंबाळ केले विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तेथील असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
बारामतीच्या समर्थनगर गुणवडी रोड परिसरात ही घटना घडली असून सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद.
ही लहान मुलगी अंगणात खेळत होती. त्यावेळी भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. तिच्या अंगावर झडप घालून कुत्र्यांनी तिचा चावा घेतला. या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात तात्काळ हलविण्यात आले.
दरम्यान, भटक्या कुत्र्यांबाबत वारंवार तक्रारही करण्यात आली होती. मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. चिमुकली अंगणात खेळत होती. काय तिचा दोष आहे. नाकर्त्या प्रशासनाच्या हलगर्जीपणा कुटुंबीयांच्या दु:खाला कारणीभूत आहे. तक्रार करुनही लक्ष न दिल्यामुळेच ही दुदैवी घटना घडल्याची संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
भटक्या कुत्र्यांचा वावर या भागात असल्याने व चिमुकलीवर झालेल्या हल्ल्याने या परिसरात घाबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येणाऱ्या दिवसात या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त संबंधित प्रशासनाने न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे..