बारामतीमध्ये ९२ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामतीची एकूण रुग्ण संख्या 2879 झालेली आहे..
बारामतीमध्ये ९२ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामतीची एकूण रुग्ण संख्या 2879 झालेली आहे.
बारामती वार्तापत्र
दिनांक 22/ 9 /20 रोजीच्या प्रतीक्षेत असलेल्या 05 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला असून उर्वरित अहवाल निगेटिव्ह आले आहेत तसेच कालचे (23/09/20) एकूण rt-pcr नमुने 205. एकूण पॉझिटिव्ह- 44. प्रतीक्षेत 05. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. कालचे एकूण एंटीजन 97. एकूण पॉझिटिव्ह-24 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 01+44+24=69. शहर- 28 ग्रामीण- 41 एकूण रूग्णसंख्या-2856 एकूण बरे झालेले रुग्ण- 1934 एकूण मृत्यू– 69. तसेच काल काटेवाडी व निरावागज येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत घेण्यात आलेल्या ऍक्टिव्ह सर्वेक्षण मध्ये एकूण 199 लोकांची एंटीजेन तपासणी केली असता त्यामध्ये काटेवाडी मध्ये 22 व निरावागज येथे एक असे एकूण 23 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत त्यामुळे बारामतीची एकूण रुग्ण संख्या 2879 झालेली आहे.
बारामती मधील शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये एमआयडीसीतील ३२ वर्षीय पुरूष, सहयोग सोसायटीतील ६० वर्षीय महिला, ३८ वर्षीय महिला, १० वर्षीय मुलगा, वढाणे येथील ५५ वर्षीय पुरूष, ३० वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील ४२ वर्षीय पुरूष, मुरूम येथील ७० वर्षीय पुरूष, ७० वर्षीय पुरूष, ४० वर्षीय महिला, १४ वर्षीय मुलगा, गुनवडी येथील ३६ वर्षीय महिला, सायली हिल येथील ३९ वर्षीय पुरूष, घाडगेवाडी येथील ३८ वर्षीय महिला, २१ वर्षीय युवक, ३० वर्षीय महिला, ४० वर्षीय पुरूष, ११ वर्षीय महिला, ३५ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
काऱ्हाटी येथील ५० वर्षीय महिला, सांगवी येथील ४५ वर्षीय पुरूष, ३५ वर्षीय महिला, कोऱ्हाळे बुद्रुक येथील २० वर्षीय महिला, माळेगाव बुद्रुक येथील ३३ वर्षीय पुरूष, ५२ वर्षीय पुरूष, पिंपळी येथील ६१ वर्षीय पुरूष, १३ वर्षीय मुलगा, ६५ वर्षीय पुरूष, कसबा येथील ५७ व्रषीय महिला, ६८ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
शासकीय अॅंटीजेन
तपासणीत आमराई येथील ५७ वर्षीय पुरूष, २६ वर्षीय पुरूष, सावळ येथील ६० वर्षीय पुरूष, निरावागज येथील ३७ वर्षीय पुरूष, बारामतीतील ५० वर्षीय महिला, श्रीरामनगर येथील ४ वर्षीय मुलगी, इंदापूर रोड येथील ३५ वर्षीय पुरूष, सूर्यनगरी येथील ३९ वर्षीय पुरूष, सुभाष चौक येथील ३९ वर्षीय पुरूष, ३९ वर्षीय महिला, जळोची येथील ३५ वर्षीय पुरूष, माळेगाव येथील ५७ वर्षीय पुरूष, तांबेनगर येथील २७ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील खासगी मंगल लॅबोरेटरी
प्रयोगशाळेत तपासलेल्या कोरोनाबाधितांमध्ये काटेवाडी येथील ६ वर्षीय मुलगा, मुरूम, सालाबा वस्ती येथील ४२ वर्षीय पुरूष, उंडवडी कडेपठार येथील ४० वर्षीय पुरूष, करंजेपूल येथील ३५ वर्षीय महिला, कोऱ्हाळे बुद्रुक येथील ७५ वर्षीय पुरूष, अशोकनगर येथील अजय अपार्टमेंट येथील १६ वर्षीय मुलगी, तांबेनगर येथील बालाजी गृह निर्माण संस्थेतील ५२ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
इंदापूर तालुक्यातील एक जण कोरोनाबाधित
बारामतीत तपासलेल्या व इंदापूर तालुक्यातील असलेल्या दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये तावशी येथील ८० वर्षीय पुरूष, भिगवण येथील ४६ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
दृष्टीक्षेपात बारामतीचा आढावा (गुरुवार 24 सप्टेंबर 2020)
• आजपर्यंतची एकूण रुग्ण संख्या- 2879
• उपचाराखाली असलेले रुग्ण- 877
• आजपर्यंत कोरोनाने मृत्यूमुखी पडलेले रुग्ण- 69
• पॉझिटीव्ह असलेले मात्र लक्षणे नसलेले रुग्ण- 461
• सौम्य लक्षणे असलेले रुग्ण- 293
• मध्यम लक्षणे असलेले- 56
• ऑक्सिजनवर असलेले रुग्ण- 49
• व्हेंटीलेटरवर असलेले रुग्ण- 18
• बरे झालेले एकूण रुग्ण- 1933
दाखल रुग्णांची दवाखानानिहाय स्थिती खालील प्रमाणे
• रुई ग्रामीण रुग्णालय- 26
• सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय- 74
• शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- 143
• नटराज नाट्य मंडळ कोविड सेंटर- 38
• नटराज प्रेरणा कोविड सेंटर- 22
• बारामती हॉस्पिटल- 31
• विविध खाजगी रुग्णालय- 108
• घरी विलगीकरणातील रुग्ण संख्या- 430
• पुणे येथे उपचार घेत असलेले रुग्ण- 5