बारामती; आज १७ जण कोरोना पॉझिटिव्ह.
आज दिवसभरामध्ये सकाळचे सहा व आत्ताचे ११ असे एकूण सतरा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत
बारामती; आज १७ जण कोरोना पॉझिटिव्ह.
आज सकाळी ९६ पैकी प्रलंबित असलेल्या १३ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये ११ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून आज दिवसभरात १७ रुग्ण आढळले आहेत.
बारामती शहर व तालुक्यात आढळले पेशंटचे पत्ता समर्थ नगर, पाटस रोड, दाते पेट्रोल पंपाशेजारील, रुई ,फलटण रोड ,तांबे नगर, कारटी २ रुग्ण ,गुणवडी २ रुग्ण, होळ १ रुग्ण ,कांबळेश्वर १ रुग्ण, पारवडी १ रुग्ण , कुतवळवाडी ३ रुग्ण ,इंदापूर १ रुग्ण.
बारामतीत काल ९६ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. आज सकाळी ७७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर सहाजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उर्वरीत १३ जणांचा अहवाल प्रतिक्षेत होता. यातील ११ जणांना कोरोनाची लागण झाली असून उर्वरीत दोन जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आज नव्याने आढळलेल्यांमध्ये बारामती शहरातील नऊ आणि ग्रामीण भागातील आठ रुग्णांचा समावेश आहे. गेली काही दिवस रुग्णसंख्या कमी होत असतानाच आता पुन्हा ही संख्या वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने ठोस उपाययोजना राबवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.