बारामती आणि इंदापूरच्या ‘या’ सहकारी बँकेत तुमचे पैसे आहेत का? रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई
सहकारी बँकेत आगाऊ रक्कमेबाबत व्यवहार करताना रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन झाले होते

बारामती आणि इंदापूरच्या ‘या’ सहकारी बँकेत तुमचे पैसे आहेत का? रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई
सहकारी बँकेत आगाऊ रक्कमेबाबत व्यवहार करताना रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन झाले होते
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
भारतीय रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांवर पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईतील मोगावीरा सहकारी बँक लिमिडेटसह ती बँकावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या तिन्ही बँकांना 23 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
यापैकी मोगावीरा सहकारी बँकेला 12 लाख, इंदापुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला 10 लाख आणि बारामती सहकारी बँक लिमिटेडला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
तपासणीत अनियमितता निदर्शनास आल्याने कारवाई
मोगावीरा सहकारी बँक लिमिटेडच्या आर्थिक अहवालात अनेक अनियमतता आढळून आल्याचे रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे. बँकेतील निष्क्रिय असलेल्या खात्यांचे अनेक वर्षांपासून ऑडिट झाले नव्हते. तसेच DEA फंडातील अनेक व्यवहार संशयास्पद असल्याचे दिसून आले. तसेच मोगावीरा बँकेने जोखीम व्यवस्थापनाबाबतही कोणतीही व्यवस्था केली नव्हती.
तर इंदापूर सहकारी बँकेत आगाऊ रक्कमेबाबत व्यवहार करताना रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन झाले होते. या बँकेतही जोखीम व्यवस्थापनाबाबतही कोणतीही व्यवस्था नसल्याचे रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात नमूद केले आहे.
यासंदर्भात बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्रीकांत सिकची, उपाध्यक्ष अविनाश लगड व प्रभारी कार्यकारी संचालक रवींद्र बनकर यांच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, सन 2018 -19 मध्ये बँकेकडे मोठ्या प्रमाणावर ठेवी संकलित झाल्यामुळे व त्या आर्थिक वर्षात कर्ज मागणी कमी असल्यामुळे शिल्लक रकमा या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक व महाराष्ट्राच्या सहकारी बँकेमध्ये गुंतलेल्या होत्या. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पूर्वीची रिझर्व्ह फंडाची व इमारत निधीची गुंतवणूक ही असल्यामुळे या बँकेतील गुंतवणुकीचे प्रमाण हे शेकडा पाच टक्क्यांच्या वर झालेले होते.
रिझर्व बँकेने 31 मार्च रोजी केलेल्या तपासणीत ही गुंतवणूक काढून आणि बँकांमध्ये वर्ग करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे जिल्हा बँकेतील ठेवी अन्य बँकांमध्ये बारामती अर्बन बँकेने वर्ग केलेल्या आहेत. मात्र नियमांचे तांत्रिक उल्लंघन झाले असल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या रिझर्व बँकेने बारामती सहकारी बँकेला एक लाख रुपयांचा दंड केलेला आहे. खातेदारांच्या व ठेवीदारांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका संभ्रम राहू नये, यासाठी आम्ही हे निवेदन प्रसिद्ध करीत असल्याचे बँकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.