
बारामती आणि इंदापूर विभागाला मिळाल्या नवीन लालपरी बस
प्रत्येकी १० एसटी बस देण्यात आल्या आहे
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) खरेदी केलेल्या नवीन ४० लालपरी बस पुणे विभागाला मिळाल्या आहेत. त्यामुळे उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना सोयीचे होणार आहे.
या ४० लालपरीमधून स्वारगेट, शिवाजीनगर, इंदापूर आणि बारामती या चार विभागात प्रत्येकी १० एसटी बस देण्यात आल्या आहे, अशी माहिती एसटी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
तसेच पुढील काही दिवसांत विभागातील सर्व आगारांत नव्या बस दाखल होणार आहेत.
त्यामुळे पुणे एसटी विभागातील बसची संख्या वाढणार असून, जुन्या बसमुळे प्रवाशांना होणारा त्रास कमी होणार आहे. पुणे विभागातून प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तुलनेने बस संख्या कमी आहे. त्यामुळे काही वेळा संचलनाचे नियोजन करताना अडचणी येत होत्या.
तसेच सर्व गाड्या जुन्या झाल्यामुळे रस्त्यात बंद पडण्याचे प्रमाण वाढले होते. याबाबत एसटी महामंडळ पुणे विभागीय वाहतूक अधिकारी सचिन शिंदे यांनी सांगितले की, सध्या पुणे विभागात नव्याने ४० बस दाखल झाल्या आहेत.
यामधून स्वारगेट, शिवाजीनगर, बारामती आणि इंदापूर या चार आगारांना प्रत्येकी दहा बस देण्यात आल्या आहेत. याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.