स्थानिक

बारामती आणि पुरंदर तालुक्यात वारस नोंदी उपक्रमाचे आयोजन

उद्योजक व भूखंडधारकांनी वारसनोंदी करुन घ्यावे-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांचे आवाहन

बारामती आणि पुरंदर तालुक्यात वारस नोंदी उपक्रमाचे आयोजन

उद्योजक व भूखंडधारकांनी वारसनोंदी करुन घ्यावे-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांचे आवाहन

बारामती वार्तापत्र 

राज्य शासनाच्या १०० दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या बारामती प्रादेशिक कार्यालयाच्यावतीने प्रादेशिक कार्यालय, बारामती येथे ९ एप्रिल तर असोसिएशन हॉल, जेजुरी, पुरंदर येथे ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता वारस नोंदी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमात बारामती व पुरदंर तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या, भुखंडधारकांच्या समस्या सोडविण्यात येणार आहेत. तरी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक व भूखंडधारकांनी उपस्थित राहून वारस नोंदी करुन घ्याव्यात, असे आवाहन प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!