बारामती-इंदापूर रस्त्यावरील ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची आणि इनोव्हा कारची समोरासमोर धडक,अपघातात ट्रॅक्टरचालकाचा दुर्दैवी मृत्यू
बुधवारी पहाटे ५ चे दरम्यान अपघात झाला

बारामती-इंदापूर रस्त्यावरील ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची आणि इनोव्हा कारची समोरासमोर धडक,अपघातात ट्रॅक्टरचालकाचा दुर्दैवी मृत्यू
बुधवारी पहाटे ५ चे दरम्यान अपघात झाला
बारामती वार्तापत्र
इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती साखर कारखान्याकडे जाणाऱ्या ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची आणि बारामतीच्या दिशेने येणाऱ्या इनोव्हा कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा चिरडून मृत्यू झालाय. बारामती-इंदापूर रस्त्यावरील खारा ओढ्याजवळ हा अपघात झाला.
या अपघातात ट्रॅक्टरचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे. त्याखाली ट्रॅक्टर चालकाचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर इनोव्हा कारमधील एअर बॅग उघडल्या गेल्याने आणखी मोठा अनर्थ टळला आहे. इनोव्हा कारमधील प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना बारामतीत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
इनोव्हा कार ( वाहन नंबर MH43 AJ 2053) आणि गाळपासाठी ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरला खार ओढा परिसरात अपघात झाला. यात ऊसाने भरलेली ट्राॅली ट्रॅक्टरवर कोसळली यात ट्रॅक्टरचे देखील प्रचंड नुकसान झाले. शिवाय चालकाचा जागीच मृत्यू झाला.ही घटना समजताच या ठिकाणी कारखाना यंत्रणा,वालचंदनगर पोलीस विभागाचे कर्मचारी व स्थानिक नागरिक मदतीसाठी दाखल झाले.रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.इनोव्हा मधील जखमींना उपचारासाठी बारामती येथे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.