बारामती उद्यापासुन चालू… काय कितीवेळ चालू/बंद… वाचा सविस्तर.
सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, चालणे व सायकलींग- सोमवार ते शुक्रवार सकाळी पाच ते सकाळी नऊ पर्यंत सुरु असेल, शनिवार रविवारी बंद असतील.

बारामती उद्यापासुन चालू… काय कितीवेळ चालू/बंद… वाचा सविस्तर.
सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, चालणे व सायकलींग- सोमवार ते शुक्रवार सकाळी पाच ते सकाळी नऊ पर्यंत सुरु असेल, शनिवार रविवारी बंद असतील.
बारामती वार्तापत्र
आज व्यापारी महासंघाने बारामती मधील सर्व दुकाने उद्या सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, तर अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी नऊ ते दुपारी 4 पर्यंत सुरु राहणार आहेत. अन्य सेवा मात्र जिल्हाधिकार्यांच्या आदेशाप्रमाणे सुरु राहतील.
जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निर्देशांमध्ये कोणताही बदल न करता इतर दुकानांसाठी नऊ ते एक वाजेपर्यंत ही परवानगी असेल. तब्बल दोन महिन्यानंतर प्रशासनाने व्यवहार करायला परवानगी दिल्यामुळे व्यापारी वर्गात आज आनंदाचे वातावरण होते.
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी यांनी या संदर्भात माहिती दिली.
बारामती मध्ये फक्त आठ कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तुलनेने कमी असल्याने व्यापारी महासंघाने बारामतीतील सर्व प्रकारची दुकाने सकाळी नऊ ते दुपारी 1 या वेळेत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे असे त्यांनी सांगितले.
अत्यावश्यक सेवेमध्ये खालील बाबींचा समावेश असेल
रुग्णालय, रोगनिदान केंद्र, क्लिनिक्स, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालय, औषध दुकान, औषध वितरण व वितरक, वाहतूक व पुरवठा साखळी, लस, निर्जुंतके, मास्क, वैद्यकीय उपकरणे, त्यांना सहाय्यभूत कच्चा माल उद्योग व अनुषंगिक सेवा यांचे उत्पादन व वितरण.
शासकीय व खाजगी पशुवैद्यकीय सेवा दवाखाने, अँनिमल केअर सेंटर व पेट फूड शॉप
बारामतीत खालीलप्रमाणे व्यवहार सुरु असतील.
अत्यावश्यक वस्तू व सेवा संबंधित सर्व दुकाने व आस्थापना- सर्व दिवशी दुपारी चार पर्यंत सुरु असतील
अत्यावश्यक वस्तू व सेवा वगळता इतर सर्व दुकाने सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत सर्व दिवस सुरु असतील.
मॉल्स, सिनेमा हॉल, मल्टीप्लेक्स, सिंगल स्क्रीनसह नाटयगृह बंद असतील
हॉटेल्स, रेस्टॉरंट, उपहारगृह, खानावळी, शिवभोजन थाळी- फक्त पार्सल सेवा घेवून जाण्यासाठी व होम डिलिव्हरी सेवा सुरु असेल.
सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, चालणे व सायकलींग- सोमवार ते शुक्रवार सकाळी पाच ते सकाळी नऊ पर्यंत सुरु असेल, शनिवार रविवारी बंद असतील.
सामाजिक, धार्मिक, राजकीय तसेच सांस्कृतिक कार्यक्रम व मेळावे होणार नाहीत.
लग्नसमारंभास कमाल 25 व्यक्तींना परवानगी
अंत्यविधीस कमाल 20 व्यक्तींना परवानगी
ज्या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची सोय सेल अशी बांधकामे सुरु राहतील
कृषी व कृषीपूरक सेवा सोमवार ते शुक्रवार दुपारी चार पर्यंत सुरु राहतील.
सकाळी पाच पासून ते संघ्याकाळी पाच पर्यंत जमावबंधी (पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र न येणे) व संध्याकाळी पाच ते सकाळी पाच पर्यंत संचारबंदी असेल, या काळात कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही.
व्यायामशाळा, केशकर्तनालय, ब्युटी पार्लर्स, स्पा, वेलनेस सेंटर्स सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था 50 टक्के क्षमतेसह सुरु असेल.
वन विभागाने घोषित केल्यानुसार वनीकरण संदर्भातील कामकाज
दरम्यान ही प्रक्रिया येत्या 15 जूनपर्यंत सुरू राहील. त्यानंतर सरकार ज्याप्रमाणे निर्बंध शिथिल करेल, त्यानुसार त्यामध्ये बदल होईल असे गुजराथी यांनी सांगितले. त्यामुळे उद्यापासून बारामती मधील सर्व प्रकारची दुकाने सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत सुरू राहणार आहेत. थोडक्यात बारामतीतील संपूर्ण बाजारपेठ दुपारी एक पर्यंत सुरू राहणार आहे, तर त्यानंतर अत्यावश्यक सेवा सरकारने ठरवून दिलेल्या वेळेनुसार म्हणजे दुपारी चारपर्यंत सुरू राहणार आहेत.