बारामती उपविभागात १ ते १६ नोव्हेंबर रोजी कलम ३३ (१) लागू
दारू रॅकेटचे परिक्षण देखील या परिसरात करता येणार नाही.
बारामती उपविभागात १ ते १६ नोव्हेंबर रोजी कलम ३३ (१) लागू
दारू रॅकेटचे परिक्षण देखील या परिसरात करता येणार नाही.
बारामती वार्तापत्र
मुंबई पोलीस कायदा १९९१ च्या नियम ३३ (१) (ओ) (यु) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून उपविभागीय दंडाधिकारी बारामती यांनी सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार शोभेची दारू व फटाके साठा केलेल्या दुकानापासून १०० मीटर परिसरात धुम्रपान करणे, कोणत्याही प्रकारचे दारू काम करणे, कोणत्याही प्रकारचे फटाके उडवणे या सर्व गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे. त्याबरोबर शोभेच्या दारू रॅकेटचे परिक्षण देखील या परिसरात करता येणार नाही. सदर आदेश बारामती उपविभागात १ ते १६ नोव्हेंबर २०२१ या कालावधीसाठी लागू राहतील.
प्रशासनाच्या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती मुंबई पोलीस कायदा १९५१ च्या कलम १३१ नुसार शिक्षेस पात्र राहील,असे उपविभागीय दंडाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी कळविले आहे.