स्थानिक

बारामती एमआयडीसीतील भंगार गोडाऊन जळून खाक?

, स्क्रॅप मटेरील मोठ्या प्रमाणात जळाल्याने लाखों रुपयांचे मोठे नुकसा

बारामती एमआयडीसीतील भंगार गोडाऊन जळून खाक?

, स्क्रॅप मटेरील मोठ्या प्रमाणात जळाल्याने लाखों रुपयांचे मोठे नुकसा

बारामती वार्तापत्र

बारामती अौद्योगिक वसाहतीमधील एका स्क्रॅप मटेरीअलच्या गोडावूनला आग लागल्याची घटना सोमवारी (दि २१) दुपारी घडली. उन्हाचा प्रचंड तडाखा आणि त्यात लागलेली आग यामुळे क्षणार्धातच ही आग प्रचंड भडकली.

धुराचे लोटच्या लोट आकाशात उडू लागले. दूर अंतरावरूनही या आगीचा अंदाज येवू लागला.

सोमवारी दुपारी अचानक लागलेल्या या आगीने काही वेळातच राैद्ररुप धारण केले. त्यामुळे आग धुमसत असल्याचे चित्र हाेते.आगीची तीव्रता मोठी असल्याने सर्वत्र धुराचे साम्राज्य निर्माण झाले होते. भडकलेल्या आगीचे लोट पाहून अनेकांच्या काळजात धडकी भरली. एमआयडीसीतील अग्नीशामक दलाच्या वाहनांनी तातडीने पोहचत आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरुच ठेवले होते. मात्र, आगीची तीव्रता मोठी असल्याने आग कित्येक तास धुमसत राहिली.

आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु यापूर्वीही स्क्रॅप गोडावूनला आग लागल्याच्या घटना एमआयडीसीत घडल्या आहेत. स्क्रॅप गोडावून धारकांनी अग्निशमन यंत्रणा उपलब्ध ठेवणे गरजेचे बनले आहे. दरम्यान या आगीत कोणतीही जीवीतहानी झालेली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मात्र, स्क्रॅप मटेरील मोठ्या प्रमाणात जळाल्याने लाखों रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. एमआयडीसीतील भारत फोर्ज कंपनीच्या पाठीमागील बाजुस हे गोडावून आहे.

Related Articles

Back to top button