बारामती एमआयडीसी मधील कर्मचाऱ्यांच्या वतीने आंदोलन,जो कोणी गुणरत्न सदावर्ते याची जिभ हासडेल त्याला मी माझ्या वतीने ११ लाख रुपयांचे बक्षीस? कामगार नेते तुकाराम चौधरी
ऍड सदावर्ते व हल्लेखोराना कडक शासन करण्याची मागणी
बारामती एमआयडीसी मधील कर्मचाऱ्यांच्या वतीने आंदोलन,जो कोणी गुणरत्न सदावर्ते याची जिभ हासडेल त्याला मी माझ्या वतीने ११ लाख रुपयांचे बक्षीस? कामगार नेते तुकाराम चौधरी
ऍड सदावर्ते व हल्लेखोराना कडक शासन करण्याची मागणी
बारामती वार्तापत्र
बारामती एमआयडीसी मधील विविध कंपनी मधील कामगार संघटना यांच्या वतीने ०८ एप्रिल रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक वरील हल्ल्याच्या निषेधार्थ व ऍड गुणरत्न सदावर्ते व हल्लेखोर यांना कडक शासन करावे या मागणी साठी तालुका पोलीस स्टेशन ला निवेदन देऊन पेन्सील चौक ते भिगवण चौक येथे निषेध रॅली काढण्यात आली.
जो कोणी गुणरत्न सदावर्ते याची जिभ हासडेल त्याला मी माझ्या वतीने ११ लाख रुपयांचे बक्षीस देईन.
वजी कामगार महिला त्या गुणरत्न सदावर्ते च्या हातात बांगड्या भरेल तिला मी ५ लाख रुपयांचं बक्षीस देईन. अशी घोषणा बारामती टेक्स्टाईल पार्क चे कामगार तुकाराम चौधर यांनी माध्यमांशी बोलताना बारामती येथे केली.पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा निषेध करत वकील गुणरत्न सदावर्ते यांना आव्हान दिले.
चौधर पुढे म्हणाले, सदावर्ते हा माणूस विविध कामगार संघटनांमध्ये शिरून कामगारांना पुढे संकट निर्माण करण्याचे काम करत आहे. त्यामधूनच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. बारा एप्रिल रोजी सदावर्ते म्हणाले होते बारामती मध्ये पवारांच्या घरा समोर आंदोलन करू. मात्र सदावर्ते व त्यांच्या मनोवृत्तीच्या लोकांना आम्ही सांगू इच्छितो बारा तुम्ही बारामती मध्ये येऊन तर पहा आम्ही त्यांची वाटच पाहत आहोत, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
या वेळी तालुका पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात ग्रीव्ह्ज कॉटन अँड अलाईड कंपनीज एम्प्लॉएज युनियन पियाजो व्हेईकल प्रा.लि.बारामती तानाजी खराडे,सचिन चौधर पुना एम्प्लॉईज युनियन त्रिमूर्ती इ.प्रा.लि.बारामती,भाऊ ठोंबरे मनोज सावंत,भारतीय कामगार सेना सुयश ऑटो बारामती भारत जाधव पोपट घुले,श्नायबर डायनॅमिक्स डेअरीज एम्प्लॉएज युनियन बारामती नानासो थोरात, गजानन भुजबळ इमसोफर मॅन्यु एम्प्लॉएज युनियन बारामती नानासो बाबर, अमोल पवार आयएसएमटी कामगार संघटना बारामती कल्याण कदम,गुरुदेव सरोदे भारत फोर्ज कामगार संघटना (कॅम) बारामती राहुल बाबर, आनंद भापकर ,बारामती दूधसंघ कामगार कृती संघटना (नंदन डेअरी/पशुखाद्य) राहुल देवकाते ,प्रकाश काटे बारामती तालुका अंगणवाडी सेविका आशाताई शेख यांच्या सह्या आहेत
या वेळी कामगार सेनेचे भारत जाधव,व नाना थोरात,राहुल बाबर,रमेश बाबर,खंडू गायकवाड,गुरुदेव सरोदे,तानाजी खराडे व टेक्स्टाईल पार्क मधील विविध युनिट मधील महिलांनी नि मनोगत व्यक्त केले तुकाराम चौधर यांनी सूत्रसंचालन केले.