बारामती करांचं टेन्शन वाढलं! कसबा परिसरातील एका १५ वर्षीय मुलाला जीबीएसची लागण
वडील अपंग शेतकरी आहेत. सध्या त्यांना युवकाच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.

बारामती करांचं टेन्शन वाढलं! कसबा परिसरातील एका १५ वर्षीय मुलाला जीबीएसची लागण
वडील अपंग शेतकरी आहेत. सध्या त्यांना युवकाच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.
बारामती वार्तापत्र
पुणे शहरात भीतीदायक वातावरण निर्माण करणाऱ्या ‘जीबीएस’ने काढता पाय घेतलेला असतानाचा बारामती शहरातील कसबा परिसरातील एका १५ वर्षीय युवकास ‘जीबीएस’ आजाराची लागण झाली आहे. त्याला शुक्रवारी (दि.२५) पुणे शहरात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
सध्या बारामती तालुक्यात यात्रा-जत्रा सुरु आहेत. या युवकाचे ग्रामीण भागातील जत्रांमधून फिरणे झाले होते. त्या ठिकाणी त्याने काही पदार्थ खाल्ले होते, अशी माहिती संबंधित युवकाच्या कुटुंबियांनी दिल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेश जगताप यांनी सांगितले. याबाबत सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश जगताप यांनी सांगितले की, कसब्यातील १५ वर्षीय मुलाला गुरुवारी (दि. २४) सकाळी अशक्तपणा जाणवू लागला. शिवाय त्याला उठता येत नव्हते. त्याला घेवून त्याचे पालक कसबा येथील खासगी डॉक्टरांकडे गेले. तपासणीनंतर पुढील उपचारासाठी या मुलाला भाग्यजय हाॅस्पिटलच्या डॉ. आर. डी. वाबळे यांच्याकडे दाखल करण्यात आले.
या ठीकाणी मेंदु विकास तज्ञ डाॅ.सुयोग दोशी यांनी त्याची तपासणी केली. त्यानंतर डाॅ. दोशी यांनी त्याची तपासणी केल्यानंतर यांनी हा युवक संशयित ‘जीबीएस’ रुग्ण असल्याची शक्यता व्यक्त करत त्याला उपचारासाठी पुण्याला पाठविण्याची शिफारस केली. त्यानंतर या युवकाला पुणे शहरातील काशीबाई नवले हाॅस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. शुक्रवारी(दि २५) या युवकाला या ठीकाणी दाखल करण्यात आले असुन त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
तसेच त्याला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.मनोज खाेमणे यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यानुसार सबंधित युवक वास्तव्यास असलेल्या परिसराचे तातडीने सर्व्हेक्षण हाती घेण्यात येत आहे. तेथील संशयित रुग्णांची उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करुन लक्षणे आढळल्यास उपचार करण्यात येतील. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णाला गरज पडल्यास पुणे शहरात उपचारास पाठविण्याची शिफारस करण्यात येइल.
दरम्यान,त्या युवकाचे ग्रामीण भागातील यात्राजत्रांमधून फिरणे झाले होते. त्याठीकाणी त्याने काही पदार्थ खाल्ले होते. अशी माहिती संबंधित युवकाच्या कुटुंबियांनी दिल्याचे डाॅ.जगताप यांनी सांगितले. आरोग्य विभाग याबाबत सखोल तपासणी करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. दरम्यान, या युवकाची परिस्थिती बेताची आहे. त्याचे वडील अपंग शेतकरी आहेत. सध्या त्यांना युवकाच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.