स्थानिक

बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती मधुन आंबा लंडनला रवाना

१० टन आंबा लंडन कडे रवाना

बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती मधुन आंबा लंडनला रवाना

१० टन आंबा लंडन कडे रवाना

बारामती वार्तापत्र

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे जळोची उपबाजार येथील निर्यात सुविधेवरून चालु हंगामातील पहिला कंनटेर लंडन कडे रवाना झाला. त्याचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती विश्वासराव आटोळे यांचे शुभहस्ते झेंडा दाखवुन करण्यात आला.

पणन मंडळाचे निर्यात सुविधा केंद्र असुन सदर सुविधा केंद्र बारामती बाजार समिती सन २०१४ पासुन चालवित असुन रेन्बो इंटरनॅशनल प्रा. लि. पुणे यांचे मार्फत दरवर्षी आंबा निर्यात केला जातो. निर्यातदार यांचे मुळे आंबा उत्पादक शेतक-यांना चांगला दर मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुरदृष्टीने सन २००७ मध्ये जळोची येथे निर्यात सुविधा केंद्र उभारणेत आले आहे.

त्याच धर्तीवर आता जळोची येथे आणखी मॅग्नेट प्रकल्पांतर्गत फळे व भाजीपाला हाताळणी केंद्र उभारणेत आले असुन सदर प्रकल्प लवकरच सुरू होत आहे. त्याठिकाणी नवीन निर्यातदार येणार असल्याने त्याचा उपयोग परिसरातील शेतक-यांना होणार असल्याचे मत सभापती विश्वास आटोळे यांनी व्यक्त केले.

गतवर्षी याच सुविधा केंद्रावरून ४८५ टन आंबा ऑस्ट्रेलिया, लंडन, अमेरिका व चीन या देशात निर्यात झाला आहे. सुविधेवरून सुरूवातीला पहिल्या कंटेनरमध्ये १० टन आंबा लंडन कडे रवाना झाला. आंबा उत्पादक शेतक-यांनी सेंद्रीय खताचा वापर करून निर्यातक्षम दर्जेचे व रिसेड्यु फ्री उत्पादन करून या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन सचिव अरविंद जगताप यांनी यावेळी केले आहे.

आंबा हा फळांचा राजा म्हणुन ओळख असणा-या आंब्याची निर्यात गेली १५ वर्षापासुन सुरू असुन आत्ता पर्यन्त रेन्बो इंटरनॅशनलचे या कंपनीने लंडन, जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, चीन या देशात देवगड हापुस, केशर आंबा निर्यात केला आहे. महाराष्ट्र राज्यासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात या राज्यातील शेतक-यांचा निर्यातक्षम आंबा खरेदी करून आकर्षित पॅकींग मध्ये निर्यात करीत आहोत.

याबाबत कृषि विभागाचे ही सहकार्य होत आहे. सध्या निर्यात सुरू झाली असल्याने लंडन येथे पहिला कंटेनर पाठवित असुन पुढे ऑर्डर प्रमाणे वेगवेगळ्या देशात निर्यात करण्याचा मानस आहे असे रेन्बो इंटरनॅशनलचे मालक अभिजित चंद्रकांत भसाळे यांनी सांगितले. सभपाती व सचिवांनी निर्यातदार यांना शुभेच्छा देऊन चालना दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!