बारामती क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योग शिबीर संपन्न
म.ए.सो हायस्कूलचे क्रीडा शिक्षक व योगाचार्य दादासाहेब शिंदे सर यांनी योगा प्रशिक्षण शिबीर घेतले.

बारामती क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योग शिबीर संपन्न
म.ए.सो हायस्कूलचे क्रीडा शिक्षक व योगाचार्य दादासाहेब शिंदे सर यांनी योगा प्रशिक्षण शिबीर घेतले.
बारामती वार्तापत्र
आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल मधील लॉन टेनिस ग्राउंड वर करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील,तहसीलदार विजय पाटील,बारामती बँकेचे व्हाईस चेअरमन अविनाश लगड, क्रेडाई चे अध्यक्ष दिपक काटे ,प्रो कबड्डी खेळाडू दादासो आव्हाड यांच्यासह विविध शाखेचे शासकीय पदाधिकारी तसेच बॅडमिंटन, कब्बडी, व्हॉलीबॉल,लॉन टेनिस, स्पोर्ट्स झुंबा,कराटे या खेळाचे प्रशिक्षक, खेळाडू व पदाधिकारी याच्या उपस्थिती मध्ये कोरोनाबाबतच्या शासकीय नियमाचे पालन करून उत्साहात पार पडला.
म.ए.सो हायस्कूलचे क्रीडा शिक्षक व योगाचार्य दादासाहेब शिंदे सर यांनी योगा प्रशिक्षण शिबीर घेतले. आभार तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी मानले.