
राजवर्धन पाटील यांनी केली अपघातग्रस्तांना मदत.
स्वत:च्या गाडीतून पोहचवले रुग्णालयात.
इंदापूर:-प्रतिनिधी
नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील हे सोलापूर-पुणे महामार्गावरून काही कामानिमित्त जात असता पळसदेव व काळेवाडी दरम्यान त्यांना गर्दी दिसून आली. यावेळी राजवर्धन पाटील यांनी आपल्या चालकास त्वरित गाडी थांबवण्यास सांगितले. खाली उतरून पाहिले असता दुचाकी गाडी वरून जात असलेल्या व्यक्तींना एक चार चाकी गाडी उडवून निघून गेल्याने ते जखमी अवस्थेत पडलेले दोघेजण त्यांच्या निदर्शनास आले. बघ्यांची गर्दी वाढत होती कोणीतीही व्यक्ती त्यांना मदतीसाठी पुढे येत नव्हता त्यामुळे प्रसंगावधान ओळखून पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्वरित आपल्या गाडीत या दोघांना टाकून भिगवण येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
त्यानंतर राजवर्धन पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून अपघातग्रस्तांच्या नातेवाइकांशी संवाद साधत घडलेल्या अपघाताची कल्पना दिली. राजवर्धन यांनी आपले कर्तव्य पार पाडल्याने अपघात ग्रस्त यांच्यावर वेळेत उपचार होणार आहेत.