क्राईम रिपोर्ट
बारामती गुन्हे शोध पथकाने दमदार कामगिरी करत मुलाच्या खून प्रकरणातील गुन्हेगारास तीन तासात पकडले
वनविभागातील झाडीत लपलेल्या गुन्हेगारास ताब्यात
बारामती गुन्हे शोध पथकाने दमदार कामगिरी करत मुलाच्या खून प्रकरणातील गुन्हेगारास तीन तासात पकडले
वनविभागातील झाडीत लपलेल्या गुन्हेगारास ताब्यात
क्राईम; बारामती वार्तापत्र
आई-वडिलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या सावत्र मुलाची वडिलाने कोयत्याने मानेवर वार करून हत्या केल्याची धक्कादायक घडली. ही घटना बारामती तालुक्यातील पारवडी येथील शिपकुले वस्तीवर घडली. आरोपी वडील हा कातकरीचे काम करतो. लाकडे तोडण्यासाठी लागणाऱ्या कोयत्याने त्याने आपल्या मुलावर वार केले.
अवघ्या एक तासाच्या आरोपीला अटक –
या घटनेत कोयत्याचा घाव जोरात बसल्याने मुलाचा यात जागीच मृत्यू झाला. गोपीनाथ मारुती जाधव (वय-18) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी वडील मारुती जाधव (वय-45) यास बारामती तालुका पोलिसांनी अवघ्या एक तासाच्या आत अटक केली. आरोपी वडिलावर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हेशोध पथकाने पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे घटना स्थळापासुनचा वनविभागाचा १० ते १५ कि मी चा टप्पा पायी फिरून वनविभागातील झाडीत लपलेल्या गुन्हेगारास अवघ्या ३ तासात ताब्यात घेतले पुढील कार्यवाही पोलीस निरीक्षक ढवाण हे करीत आहेत .
सदरची कामगीरी मा.पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख साो,अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते ,उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे , पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांढरे, नंदु जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे,यांनी केली आहे.