बारामती चा ‘मदरसा’ प्रश्न मिटणार कधी?
सर्व कारणाने ट्रस्टची धर्मादाय आयुक्तांना चौकशीचे आदेश
बारामती वार्तापत्र
बारामती येथील मदरसा दारुल उलूम मौलाना युनूसिया च्या कारभाराबाबत सोहेल गुल मोहम्मद शेख यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. यामध्ये मदरसा ट्रस्ट कडून जनतेतून जकात ,देणगी मदरसा च्या नावाखाली गोळा केली जाते.मदरसा आपल्या आर्थिक व्यवहारांचे रेकॉर्ड ठेवत नाही, लेखापरीक्षण अहवाल नाही. शगनशाह दर्गा मस्जिद च्या जागेवर मदरसा ने विनापरवानगी व निविदा न काढताच बांधकाम केले आहे. मदरसा कडून मळद येथे ट्रस्टचा विश्वस्त नसणाऱ्या व्यक्तीच्या नावावर जमीन खरेदी केली आहे. या सर्व कारणाने ट्रस्टची धर्मादाय आयुक्तांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत .
तर ट्रस्टच्यावतीने वरील सर्व आरोप फेटाळत ट्रस्टने कोणाकडूनही जकात किंवा देणगी घेतली नाही, नागरिकांनी स्वेच्छेने देणगी दिली तरच ती घेतली जाते .2019 पर्यंतचे सर्व लेखापरीक्षण अहवाल उपलब्ध आहे. ते अहवाल न्यायालयातही देण्यात आले होते व याचिकाकर्त्यांच्या वकिलाकडे ही लेखापरीक्षण अहवाल उपलब्ध आहेत. शगनशाह दर्गाह मस्जिद च्या जागेवर झालेले बांधकाम निविदा काढून, वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन, टेंडर करण्यात आले आहे लोयेस्ट पद्धतीने हे काम करून सर्व व्यवहार चेक द्वारे करण्यात आले आहेत. मदरसा ने एक जमिनीचा एक तुकडा देखील खरेदी केलेला नाही. ज्या खाजगी व्यक्तीच्या नावावर जमीन आहे ती जमीन ट्रस्टची नाही. न्यायालयाने या याचिकेवर निर्णय देऊन हे प्रकरण धर्मादाय आयुक्त यांच्याकडे चालवावे व त्यावर सहा महिन्यात निर्णय घ्यावा असे उच्च न्यायालयाने सांगितले आहे मात्र मदरसा ट्रस्टची व समाजाची बदनामी करण्याच्या हेतूने या निर्णयाचा चुकीचा अर्थ तक्रारदार काढत आहेत. असे ट्रस्टच्यावतीने सेक्रेटरी हाजी सलीम बागवान यांनी सांगितले .