बारामती ची हद्द वाढ लवकरच वाढण्याची शक्यता ?.
बांदलवाडी , मेडद , मळद आदी गावे नगरपरिषद हद्दीत येण्याची शक्यता ?.
बारामती ची हद्द वाढ लवकरच वाढण्याची शक्यता ?.
बांदलवाडी , मेडद , मळद आदी गावे नगरपरिषद हद्दीत येण्याची शक्यता ?.
बारामती नगरपरिषद ची हद्द वाढ लवकरच होण्याची शक्यता आहे रुई,तांदुळवाडी, जळोची आदी गावे नगरपरिषद हद्दीत आणल्यावर आता बांदलवाडी , मेडद , मळद आदी गावे येण्याच्या मार्गावर आहे कारण आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरपरिषद च्या पदाधिकारी व अधिकारी यांच्या समवेत या गावांना भेट देऊन पाहणी केली.
आज शनिवार दि ३०/०५/२०२० रोजी शासकीय मागासवर्गीय वसतीगृहाची पाहणी केल्यानंतर बांदलवाडी , मेडद व मळद ही गावे बारामती नगरपालीका हद्दीत घेण्यात यावी अशी चर्चा मा. अजितदादा पवार ,गटनेते सचिन सातव व बांदलवाडी चे ग्रामस्थ व पत्रकार दिलीप शिंदे यांच्या मध्ये झाली त्यावेळी सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
अजितदादा यांनी प्रांत , तहसीलदार, व सार्वजनिक बांधकाम विभागाचे चे अधिकारी यांना वरील सदरची गावे नगरपालीकेत घेण्याच्या सुचना देऊन ताबडतोब ठराव करून पाठवून देण्यास सांगितले,
त्यामुळे आता बारामती नगरपरिषद ची हद्द वाढ होणार या बाबत जोरदार चर्चा बारामती मधील नागरिकांत रंगली आहे.