सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क परिधान न करणाऱ्या आणि थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार.
विना मास्क फिरणाऱ्या व थुंकणाऱ्यांवर ५०० रुपये दंडाची होणार कारवाई.

सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क परिधान न करणाऱ्या आणि थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार.
विना मास्क फिरणाऱ्या व थुंकणाऱ्यांवर ५०० रुपये दंडाची होणार कारवाई
बारामती:-प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क परिधान न करणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
करोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या तसेच पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणे किंवा त्या शिवाय थुंंकनाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत तसेच छावणी परिषद हद्दीमध्ये सदर आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्यानुसार जे नागरिक मास्कचा वापर न करता सार्वजनिक ठिकाणी फिरताना किंवा थांबलेले असताना व गाडी चालवत असताना आढळल्यास तसेच सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंंकल्यास पाचशे रुपये दंड आकारण्याचे आदेश दिले आहेत. सदर दंडाची वसुली करण्याचे अधिकार ग्रामस्तरावर ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत कर्मचारी यांना तर नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकार्यांना दिले आहेत. सदर आदेशाचा भंग करणाऱ्यांवर साथीरोग अधिनियमान्वये कारवाई करण्यात येणार आहे.