बारामती तालुका देशात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न; उपमुख्यमंत्री अजित पवार
३०० कोटी रुपयांचे पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे काम करण्यात येणार

बारामती तालुका देशात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न; उपमुख्यमंत्री अजित पवार
३०० कोटी रुपयांचे पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे काम करण्यात येणार
बारामती वार्तापत्र
बारामती तालुका व शहरात सर्व प्रकारची विकासकामे दर्जेदार पद्धतीने करुन बारामती एक आदर्श शहर म्हणून देशात उदयास आले पाहिजे, बारामती तालुका देशात विकासकामांच्या बाबतीत क्रमांक एकचा तालुका म्हणून करायचा आहे, यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. सुमारे ३०० कोटी रुपयांचे पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे काम करण्यात येणार आहे. तालुक्यात विविध विकासकामे सुरु असून याकरीता नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले.
श्री. देशमुख म्हणाले, नागरिकांचा चोरी गेलेला विविध प्रकारच्या मुद्देमालाचा शोध घेवून तो नागरिकांच्या ताब्यात देण्यात येत आहे, याबाबत जिल्हा पोलीस दलाचा प्रमुख म्हणून आपल्याला सार्थ अभिमान आहे, असेही श्री. देशमुख म्हणाले.
श्री. बिरादार म्हणाले, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सहकार्याने बऱ्हाणपूर येथे सर्व सुविधांयुक्त पोलीस उपमुख्यालय एक प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प म्हणून उभारण्यात आलेला आहे. या उपमुख्यालयाची ख्याती राज्यभर आहे. पोलीस दलाला आवश्यक त्या सर्व प्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. बारामती उपविभागांतर्गत १०० दिवस कार्यक्रमात नागरिकांना मुद्देमाल परत करणे, इमारतीची साफसफाई आदी कामे करण्यात येत आहे, असे श्री. बिरादार आहे.
यावेळी श्री. पवार यांच्या हस्ते बारामती वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने जनजागृतीपर माहितीपत्रिकेचे लोकार्पण करण्यात आले.