बारामती तालुका पंचायत समितीच्या उप’सभापती पदी श्री.रोहित बळवंत कोकरे यांची निवड
एकमेव अर्ज आल्याने श्री.रोहित कोकरे यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली.

बारामती तालुका पंचायत समितीच्या उप’सभापती पदी श्री.रोहित बळवंत कोकरे यांची निवड
एकमेव अर्ज आल्याने श्री.रोहित कोकरे यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली.
बारामती वार्तापत्र
आज दि.०९/०४/२०२१ रोजी बारामती पंचायत समितीच्या उपसभापती पदासाठी झालेल्या सदस्यांच्या बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांचे आदेशानुसार उपसभापती पदी श्री.रोहित बळवंत कोकरे, रा.पणदरे ता.बारामती यांची निवड करण्यात आली. सदर निवडीची घोषणा बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री.संभाजीनाना होळकर यांनी केली.
एकमेव अर्ज आल्याने श्री.रोहित कोकरे यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली. याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती निता फरांदे,मा.उपसभापती प्रदिप धापटे, सदस्य व पदाधिकारी यांनी नवनिर्वाचित उपसभापती यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या…! 💐
यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजीनाना होळकर,सभापती निताताई फरांदे, गटनेते प्रदीप धापटे,पंचायत समिती सदस्य भारत गावडे,राहुल भापकर,राहुल झारगड,संजय भोसले, सदस्या अबोली भोसले,शारदा खराडे,मेनका मगर,लिलावती गावडे, दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप,दूध संघाचे संचालक संजय देवकते,संजय जगताप,तालुका पदाधिकारी अँड.रविंद्र माने,सुनिल बनसोडे,तुषार लोखंडे,मिलिंद मोरे,सोमनाथ कदम,वैभव पवार,त्याचप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मा.विजय पाटील तसेच गटविकास अधिकारी मा.राहुल काळभोर,कक्ष अधिकारी कुंदन दराडे,अधिक्षक किरण जगताप,पंचायत समितीचे अधिकारी सर्व कर्मचारी तसेच निवडीनंतर राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.