बारामती तालुका पोलिसांची दमदार कामगिरी… रविराज तावरे यांच्यावर गोळीबारात सहभागी असलेले ४ आरोपी २४ तासांच्या आत ताब्या
बारामती हॉस्पिटल येथे तातडीचे उपचार सुरू झाले. त्यानंतर त्यांना गिरीराज हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले.

बारामती तालुका पोलिसांची दमदार कामगिरी… रविराज तावरे यांच्यावर गोळीबारात सहभागी असलेले ४ आरोपी २४ तासांच्या आत ताब्या
बारामती हॉस्पिटल येथे तातडीचे उपचार सुरू झाले. त्यानंतर त्यांना गिरीराज हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले.
क्राईम ; बारामती वार्तापत्र
राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे यांच्यावर गोळीबार प्रकरणी आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. बारामतीत अल्पवयीन तरुणासह चौघांना अटक करण्यात आली आहे. बारामती तालुका पोलिसांनी अवघ्या सात तासात आरोपींचा छडा लावला. राजकीय वैमनस्यातून रविराज तावरेंवर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बारामती तालुक्यातील माळेगावमध्ये सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास तावरेंवर दुचाकीस्वारांनी भररस्त्यात गोळीबार केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रविराज तावरे हे जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती आहेत. बारामती शहरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
एका अल्पवयीन तरुणासह राहुल उर्फ रिबेल यादव, प्रशांत मोरे, विनोद उर्फ टॉम मोरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली. बारामती तालुका पोलिसांसह गुन्हे शोध पथकाकडून आरोपींना अटक करण्यात आली. बारामतीच्या इतिहासात प्रथमच एका राजकीय नेत्यावर हल्ल्याची घटना घडली
घटना घडल्यानंतर अवघ्या सहा तासात ३ संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याची माहिती आज दुपारी पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. ढवाण यांनी दिलेल्या माहितीनुसार यातील एक आरोपी हा उरूळी कांचन येथे असल्याचे समजले. त्यावरून फौजदार मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तेथे सापळा रचून त्या आरोपीला ताब्यात घेतले.
दरम्यान जिल्हा परिषद सदस्य रोहिणी तावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रशांत मोरे याचा यात मुख्य सहभाग आहे असे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली. प्रशांत मोरे यास मुंबई येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेत अल्पवयीन मुलाचाही सहभाग असल्याचे आढळून आल्याने पोलीस अधिकारी देखील चक्रावून गेले आहेत. राजकीय वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
नेमकं काय घडलं?
रविराज तावरे हे पत्नी- जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्यासह सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास संभाजीनगरला वडापाव घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर गाडीकडे येत असताना अचानक दुचाकीवर आलेल्या दोघा जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर तावरे खाली कोसळले. तर गाडीमध्ये बसलेल्या त्यांच्या पत्नी रोहिणी तावरे यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे या परिसरात क्रिकेट खेळणारी मुले धावत आली. तोपर्यंत हल्लेखोरांनी गोळीबार करुन पळ काढला होता. जखमी अवस्थेतील तावरेंना तातडीने मित्राच्या कारमधून बारामती येथील खासगी रुग्णालयात हलवले.