बारामती तालुका पोलीसांची आणखी एक धडाकेबाज कामगिरी- खुणाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना केले कोल्हापुरात जेरबंद
खिशातून चाकू काढून चाकूने फिर्यादीच्या मानेवर जोरात वार
बारामती तालुका पोलीसांची आणखी एक धडाकेबाज कामगिरी- खुणाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना केले कोल्हापुरात जेरबंद
खिशातून चाकू काढून चाकूने फिर्यादीच्या मानेवर जोरात वार
क्राईम;बारामती वार्तापत्र
दिनांक 22/3/2022 रोजी 11.00 वा चे सुमारास तक्रारदार अर्चना तात्याबा साळवे रा. वडगाव निंबाळकर सध्या रा. सूर्यनगरी ता. बारामती जि. पुणे यांनी दोन पत्र्याच्या खोल्या सह एक गुंठा जागा हे तांदूळवाडी येथील मीनाक्षी विनायक जाधव व प्रदुम चव्हाण यांच्याकडून 600000 रुपये किंमत करून विकत घेतले होते.
सदर जमिनीची विसार पावती करून देखील यातील मीनाक्षी जाधव व प्रदूम चव्हाण हे जागा नावावर करत नव्हते म्हणून तक्रारदार यांनी आम्हाला तुमची जागा नको आमचे पैसे परत द्या असे म्हणून पैशाची मागणी आरोपी यांच्याकडे केली या कारणावरून यातील आरोपी प्रदुम चव्हाण याने तांदुळवाडी ते प्रगतीनगर कडे जाणारे रोडवर थांबून फिर्यादी व फिर्यादीची मैत्रिण तेथून जात असताना त्यांना गाडी आडवी मारून खिशातून चाकू काढून चाकूने फिर्यादीच्या मानेवर जोरात वार करून तुझा आज मर्डर करतो असे बोलत फिर्यादी यांची मैत्रीण रसिक दिलीप पंडित हिचे गालावर देखील चाकूने जोरात वार केला त्या दोघींनाही गंभीर जखमी केले .तसेच मीनाक्षी जाधव हिनेदेखील लाथाबुक्क्यांनी त्या दोघींना मारहाण केली दोघी रक्तबंबाळ झाल्याचे पाहून दोन्ही आरोपींनी तेथून पळ काढला.
तेथील लोकांनी जखमींना बारामती हॉस्पिटल येथे ऍडमिट केले ऍडमिट असताना फिर्यादी यांनी त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केले बाबत तक्रार दिली.
त्या अनुषंगाने बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गु.रजि. नंबर 172 / 22 भादवि कलम 307, 341 ,323 ,504, 506,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री धोत्रे साहेब हे करीत होते.
गुन्हा दाखल झालेल्या दिवसापासून यातील आरोपी हे पोलिसांना चकमा देत आपले राहण्याचे ठिकाण वेळोवेळी बदलून आज पर्यंत फरार होते. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस निरीक्षक ढवाण साहेब यांनी पोलीस स्टेशनचे तपास पथक पोलीस हवालदार राम कानगुडे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत यांना सदर आरोपीचा तात्काळ शोध घेण्याबाबत आदेश दिले.
आरोपींचा शोध घेत असताना कोणताही पुरावा नसताना तांत्रिक साधनांच्या साह्याने कसोशीने आरोपीचा शोध घेऊन दिनांक 5/4 / 22 रोजी कोल्हापूर या ठिकाणी आरोपी राहत असल्याचे माहिती मिळाल्याने कोल्हापूर या ठिकाणी जाऊन गावापासून लांब फार्महाऊसवर असलेले आरोपी मोठ्या शिताफीने आरोपींच्या मुसक्या आवळून बारामती तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री अभिनव देशमुख साहेब पुणे ग्रामीण मा. अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद जी मोहिते साहेब बारामती विभाग उपविभागीय पोलिस अधिकारी श्री गणेश जी इंगळे बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री महेश ढवाण बारामती तालुका पोलीस स्टेशन. तसेच पोलीस हवालदार राम कानगुडे पोलीस नाईक अमोल नरुटे पोलीस नाईक रणजीत मुळीक पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत महिला पोलीस नाईक सोनाली मोटे यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धोत्रे साहेब करीत आहेत.