बारामती तालुका पोलीस प्रशासनाची दमदार कारवाई,घरफोडी करणाऱ्या चोरांच्या मागे , चोर पण पकडले.
चोरट्यांकडून चोरी केलेले ४ लाख ९६ हजारांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे.
बारामती तालुका पोलीस प्रशासनाची दमदार कारवाई,घरफोडी करणाऱ्या चोरांच्या मागे , चोर पण पकडले.
चोरट्यांकडून चोरी केलेले ४ लाख ९६ हजारांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे.
क्राईम;बारामती वार्तापत्र
जराडवाडी ता. बारामती जि. पुणे येथून १४ एप्रिल रोजी दिवसा झालेल्या घरफोडीचा बारामती तालुका पोलिसांनी छडा लावला आहे. चोर पकडताना पोलिसांनी गुन्ह्यातील मुद्देमालही हस्तगत केला आहे. चोरट्यांकडून पोलिसांनी तब्बल ४ लाख ९६ हजारांचे दागिने हस्तगत केले आहेत.
ढवळ्या घरफोडी चोरी करून 10 तोळे सोने एकूण. 4, 96,000 रुपये किमतीचे चोरी करून नेलेबाबत तक्रार देणार नवनाथ पंढरीनाथ जराड रा. जराडवाडी यांचे तक्रारीवरून गुन्हा रजि. नं.210/22 भादवि कलम 454 380 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री लंगुटे हे करीत होते.
पोलीस निरीक्षक श्री महेश ढवाण साहेब यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत चोरी वाढत असल्याने चोरट्यांना पकडण्यासाठी मोहीमच हाती घेतली होती तपास पथक यांना सदर गुन्ह्याचा तपास करून लवकर गुन्ह्याचा छडा लावण्या बाबत सूचना व मार्गदर्शन त्यांनी केले होते. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री लंगुटे तपास पथकातील पोलिस अंमलदार राम कानगुडे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत व पोलीस नाईक अमोल नरूटे ,रणजीत मुळीक चोरट्यांना शोधण्यासाठी कसोशिने प्रयत्न चालू केले होते. दिनांक 22/ 4/2022 रोजी त्यांच्या प्रयत्नांना यश आले .
यामध्ये चोरी करणारे
1. सोमनाथ उर्फ सोन्या तात्या काळे वय 22 वर्ष. रा. नांदगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर
2. विधि संघर्शीत बालक वय सतरा वर्ष राहणार शेरी खुर्द ता. आष्टी जिल्हा बीड यांचा समावेश होता यातील सोमनाथ उर्फ सोन्या काळे याला नांदगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथून ताब्यात घेतले आहे तांत्रिक माहिती च्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला आहे तसेच त्यांच्याकडून चोरून नेलेल्या दहा तोळे सोन्याची रिकव्हर देखील करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक अभिनव जी देशमुख साहेब पुणे ग्रामीण .अप्पर पोलीस अधीक्षक श्री मिलिंद जी मोहिते साहेब बारामती विभाग पुणे ग्रामीण .उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे साहेब बारामती विभाग. पोलीस निरीक्षक श्री महेश ढवाण साहेब बारामती तालुका पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री लंगुटे पोलीस हवा. राम कानगुडे . पोलीस नाईक अमोल नरूटे, रणजीत मुळीक ,पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत , पोलीस नाईक सदाशिव बंडगर या सर्वांनी मिळून केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री लंगुटे करीत आहेत.