बारामती तालुका पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाच्या कार्यवाहीचा सिलसिला चालुच पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी, ८,९८,000 रुपये रुपयाचा गुटखा मुदेमालासह जप्त .
पिक अप गाडी नं एम एच २४ ए यु ३८६८ यामध्ये बेकायदा बिगर परवाना

बारामती तालुका पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाच्या कार्यवाहीचा सिलसिला चालुच पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी, ८,९८,000 रुपये रुपयाचा गुटखा मुदेमालासह जप्त .
पिक अप गाडी नं एम एच २४ ए यु ३८६८ यामध्ये बेकायदा बिगर परवाना
बारामती वार्तापत्र
बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाला गोपनीय बामतीदारामार्फत बातमी मिळाली होती की एक अनोळखी इसम हा एक पांढरे रंगाचा पिक अप गाडी नं एम एच २४ ए यु ३८६८ यामध्ये बेकायदा बिगर परवाना मानवी आरोगयास घातक असणारे गुटखा पान मसाला विक्री करण्यासाठी बारामती एमआयडीसी येथे स्पेनटेक्स कंपनी समोर येणार आहे .
आशी खात्रीशीर माहती मिळाल्याने पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांचे मार्गदर्शनाखाली गन्हे शोध पथकानी सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन शिताफीने छापा टाकुन १,९८,०००/-रु किंमतीचा ५ खाकी रंगाचे गोनी मध्ये विमल पान मसाला लिहलेले निळसर रंगाचे १००० पुडे प्रत्येकी पुडयाची ची किमतं रुपये १९८ प्रमाणे. व ७,00,000/-रु किंमतीची एक पांढरे रंगाचा महिन्द्रा कंपनीचा पिक अप गाडी नं एम एच २४ ए यु ३८६८ जु.वा.कि.अं.असा ८,९८,000/- एकुण रुपये किंमतीचा मुदेमाल माल ताब्यात घेवुन आरोपी नामे ज्ञानदेव म्यानप्पा बंडगर वय २१ वर्षे रा मशीन घरकुल एमआयडीसी सोलापुर अक्कलकोट रोड सोलापुर याचे विरुध्द प्रचलीत कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक करुन मुदेमाल ताब्यात घेण्यात आला आहे सदर गुन्हयाचा तपास चालु असुन पुढील तपास गुन्हे शोध पथकाचे पो हवा
ठोंबरे ब नं ९४९ हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख साो,अप्पर पोलीस अधिक्षक श्री. मिलींद मोहित साो,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण ,गुन्हेशोध पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार दादासाहेब ठोंबरे ,पोलीस कॉन्टेबलं राहुल पांढरे ,नंदू जाधव,विजय वाघमोडे ,विनोद लोखडे यांनी केलेली आहे.