बारामती तालुका पोलीस स्टेशन ची धडाकेबाज कामगिरी.
सन 2013पासून चोरीस गेलेल्या 31 मोटार सायकली कर्नाटक राज्यातून केल्या हस्तगत
बारामती तालुका पोलीस स्टेशन ची धडाकेबाज कामगिरी.
सन 2013पासून चोरीस गेलेल्या 31 मोटार सायकली कर्नाटक राज्यातून केल्या हस्तगत.
बारामती; वार्तापत्र
मागील 3 ते 4 महिन्यापासून सुर्यनगरी,एमआयडीसी तसेच बारामती शहराच्या आजूबाजूच्या परिसरातून मोटार सायकल चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते.मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते साो,उपविभागीय अधिकारी श्री.नारायण शिरगावकर साो यांनी बैठक घेवून सूचना दिल्या होत्या.त्याप्रमाणे पो.नि.घोलप यांनी सपोनि लंगुटे यांच्या गुन्हे शोध पथकास मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी दिली होती.
त्याप्रमाणे सपोनि लंगुटे व गुन्हे शोध पथकाने अत्यंत गोपनीय रित्या बारामती तालुक्यातील मोटार सायकल चोरीचे रेकाॅर्ड वरील गुन्हेगार यांची माहिती काढून त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले तसेच तांत्रिक मदत घेवून संशयीत अजित दशरथ आगरकर राहणार.बेलवाडी,ता.इंदापूर,जि.पुणे याला ताब्यात घेतले व वेगवेगळया युक्त्या वापरून त्याला बोलते केले.त्याने बारामती शहर व आजूबाजूच्या परिसरातून मोटार सायकल चोरून त्या कर्नाटक राज्यातील वेगवेगळ्या गावात विक्री केल्याबाबत माहिती दिली.त्याप्रमाणे सपोनि लंगुटे यांची टिम कर्नाटक येथे गेल्यानंतर लाॅक डाउन असल्यामुळे तसेच स्थानिक भाषा येत नसल्यामुळे देखील तपासामध्ये अनेक अडथळे आले.तरीसुदधा चिकाटीने प्रत्यत्न करून चोरीस गेलेल्या मोटार सायकली रात्रौ नं दिवस फिरून वेगवेगळ्या गावातून हस्तगत केल्या.आज पर्यंत एकूण 31 मोटार सायकली (एकुण अंदाजे किंमत १५,५०,००० रुपये) हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.सदर हस्तगत केलेल्या मोटार सायकली बारामती तालुका पोलीस स्टेशन,बारामती शहर पोलीस स्टेशन,वालंचदनगर पोलीस स्टेशन हददीतून आरोपी याने सन 2013पासून चोरलेल्या आहेत.आरोपी हा मोटार सायकल चोरीत सराईत असून तो हॅण्डल लाॅक तोडून व बनावट चावी वापरून मोटार सायकल चोरत होता.त्या मोटार सायकली कर्नाटक राज्यात नेवून वेगवेळया गावात मिळेल त्या किंमतीला विक्री करत होता.
सदर दुचाकी चोर पोलीसांना सापडल्या पासून बारामती शहर व आजूबाजूच्या परिसरातील मोटार चोरीचे प्रमाण कमी झालेले आहे
या कामगिरी बद्दल मा. पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रा) यांनी ३०,००० रुपयाचे बक्षीस संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना जाहीर केले आहे
सदर कारवार्इ अप्पर पोलीस अधिक्षक श्री.मिलींद मोहिते साो,उपविभागीय अधिकारी श्री.नारायण शिरगावकर साो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे,सहा.फौ.दिलीप सोनवणे, पोलीस काॅस्टेंबल नंदू जाधव, मंगेश कांबळे, विनोद लोखंडे, होमगार्ड सचिन गायकवाड, शेखर आदलिंग,पोलीस मित्र मच्छिंद्र करे यांनी केली आहे.
( आण्णासाहेब घोलप )
पोलीस निरीक्षक,
बारामती तालुका पोलीस ठाणे