बारामती तालुक्याची दिवसभरातील कोरोना रुग्णांची संख्या 21 वर पोहोचली आहे
आता बारामतीतील रुग्ण संख्या 257 झाली
बारामती तालुक्याची दिवसभरातील कोरोना रुग्णांची संख्या 21 वर पोहोचली आहे.
आता बारामतीतील रुग्ण संख्या 257 झाली.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यात 101 संशयित कोरोना नमुन्यांपैकी सकाळी 15 जण कोरोनाबाधित आढळून आले होते. आता नव्याने 9 प्रलंबित अहवालांमध्ये 6 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे बारामती तालुक्याची दिवसभरातील कोरोना रुग्णांची संख्या 21 वर पोहोचली आहे.
अर्थात काल घेतलेल्या येथे एक नमुन्यांपैकी तब्बल 80 जण निगेटिव्ह आढळून आले आहेत, हीदेखील दिलाशाची बाब आहे.
आज आढळून आलेल्या नव्या सहा रुग्णांमध्ये बारामती शहरातील 68 वर्षीय महिला, गुणवडी तील 26 वर्षीय युवक, उर्जा भवन येथील वीस वर्षीय युवती, बारामती शहरातील 43 वर्षीय महिला, मोरेवाडी येथील 61 वर्षीय पुरुष व बारामती शहरातील 36 वर्षीय पुरुष या रुग्णांचा समावेश आहे.
आता बारामतीतील रुग्ण संख्या 257 झाली आहे.