औषधाची बिल मंजूर करण्यासाठी मागितली ५ हजारांची लाच ; अधिकाऱ्यासह खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल
या कर्मचाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती

औषधाची बिल मंजूर करण्यासाठी मागितली ५ हजारांची लाच ; अधिकाऱ्यासह खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल
बारामती तालुक्यात उडाली खळबळ
बारामती वार्तापत्र
लोकसेवक संजय हे पलसदेवच्या भीमा उपसा सिंचन विभागात उपअभियंता आहेत. दरम्यान त्यांनी त्याच्याच कार्यालयात कार्यरत यातील तक्रारदार यांच्या मेडिकल बिल मंजुरीसाठी 5 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्याला खासगी व्यक्ती शिंदेने प्रोत्साहन दिले होते. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती.
पुणे : स्वतःच्या कार्यलयातीलच कर्मचाऱ्याला लाचेची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यावर अन खासगी व्यक्तीवर एसीबीने कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने बारामती तालुक्यात खळबळ उडाली आहे. पलसदेवच्या भीमा उपसा सिंचन विभागाचा उपभियंता आहे. संजय नारायण मेटे व पोपट दशरथ शिंदे (रा. बारामती) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसेवक संजय हे पलसदेवच्या भीमा उपसा सिंचन विभागात उपअभियंता आहेत. दरम्यान त्यांनी त्याच्याच कार्यालयात कार्यरत यातील तक्रारदार यांच्या मेडिकल बिल मंजुरीसाठी 5 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्याला खासगी व्यक्ती शिंदेने प्रोत्साहन दिले होते. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागीतल्याचे समोर आले आहे. त्यानुसार बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.