बारामती तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा शिवसेनेच्यावतीने सत्कार
सर्व सदस्यांना शिवसेनेच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन व फेटा बांधून सन्मानित करण्यात आले

बारामती तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा शिवसेनेच्यावतीने सत्कार
सर्व सदस्यांना शिवसेनेच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन व फेटा बांधून सन्मानित करण्यात आले
बारामती वार्तापत्र
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बारामती तालुक्यामध्ये अनेक ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढविण्यात आली.त्यामध्ये अनेक ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे सदस्य चांगल्या संख्येने निवडून आले त्याबद्दल पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून व विभागीय नेते संजय जी राऊत साहेब व विभागीय समन्वयक रविंद्रजी मिर्लेकर साहेब यांच्या सूचनेवरून पुणे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख सत्यवान जी उभे साहेब व जिल्हाप्रमुख अँड राजेंद्र काळे व विधानसभा संपर्कप्रमुख संजीव जी शिरोडकर साहेब यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार केला.
यावेळी सर्व सदस्यांना शिवसेनेच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन व फेटा बांधून सन्मानित करण्यात आले यावेळी शिवसेनेचे समन्वयक भीमराव आप्पा भोसले उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे तालुकाप्रमुख विश्वास मांढरे शहर प्रमुख वस्ताद पप्पू माने तालुका समन्वयक एडवोकेट नंदकुमार भागवत विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश मदने युवा सेना तालुका प्रमुख निखिल देवकाते व सर्व उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख शाखाप्रमुख युवासेना महिला आघाडी इत्यादी सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सत्यवान जी उभे साहेब यांनी नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन केले