माळेगाव बु

बारामती तालुक्यातील माळेगाव इंजिनिअर कॉलेज ते राजहंस चौकात लवकरच सर्व्हिस रोड तयार होणार – खा.सुप्रिया सुळे

आणखी एका तलाठ्याची नेमणूक आवश्यक आहे

बारामती तालुक्यातील माळेगाव इंजिनिअर कॉलेज ते राजहंस चौकात लवकरच सर्व्हिस रोड तयार होणार – खा.सुप्रिया सुळे

आणखी एका तलाठ्याची नेमणूक आवश्यक आहे

बारामती वार्तापत्र

माळेगांव शहराला भेडसावणाऱ्या अनेक समस्या निर्माण झाल्या असून या समस्या तातडीने मार्गी लागाव्या यासाठी खा.सुप्रिया सुळे यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संदीप आढाव यांनी दिली असून लवकरच या समस्या तातडीने दुर केल्या जातील असे आश्वासन खा.सुप्रिया सुळे यांनी दिले.
बारामती येथील प्रशासकीय भवन येथे प्रांताधिकारी वैभव नावाडकर यांच्या दालनात खा.सुप्रिया सुळे यांच्या सोबत चर्चा करण्यात आली.

यावेळी माळेगांव शहरातील खालील समस्या बाबतीत चर्चा केली.

१) निरा – बारामती या रस्त्याचे इंजिनिअर कॉलेज ते शारदा नगर असे चौपदरीकरणाचे काम झाले असून या रस्त्यावर वारंवार अपघात,वहातुक कोंडी होत असल्याने नागरिक प्रवासी शालेय विद्यार्थी यांना त्रास होत आहे.

२) इंजिनिअर कॉलेज ते राजहंस चौक या भागात अनेक ठिकाणी रस्त्यावर पंक्चर (बोगदे) ठेवल्याने या ठिकाणी सतत अपघात होत असुन अपघातास हेच बोगदे कारणीभूत असुन ते बंद करणे.

३) इंजिनिअर कॉलेज ते राजहंस चौक पर्यंत सव्हिर्स रोड तातडीने करणे.सर्व्हिस रोड तयार केल्यास मुख्य रस्त्यावर वहातुक कमी होऊन अपघात टळु शकतात.तसेच सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी दोन्ही बाजुचे अतिक्रमण काढणे आवश्यक आहे.

४) माळेगांव शहर मोठं असुन शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.माळेगाव, माळेगांव खुर्द,येळेवस्ती, पाहुणेवाडी या गावांसाठी एकच तलाठी असुन त्यांना इतर गावाचा अतिरिक्त पदभार दिल्याने ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते.त्यांंना ७/१२ उतारे, उत्पन्न दाखले व इतर कामांसाठी ताटकळत बसावे लागते.

यामुळे आणखी एका तलाठ्याची नेमणूक आवश्यक आहे.यामुळे गतीमान कामकाज होऊ शकते.

५) माळेगांव प्राथमिक आरोग्य वर्धिनी केंद्रात असलेल्या कंत्राटी कामगार यांचे पगार ४-५ महिने झाले तरी मिळाले नाहित.

संबधीत कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदार मनमानी करत आहे.यासाठी जिल्हा परिषद पुणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुचना देऊन वेळेत पगार होण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती शहरातील कार्यालयात या समस्ये बाबत स्विय सहायक सचीन यादव, बाळराजे मुळीक, नितीन हाटे यांच्या सोबत पत्रव्यवहार केला असून त्यांनी ही दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे संबंधित पत्र पाठवले आहे.तर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे व माजी अध्यक्ष, जिल्हा बँक संचालक संभाजी होळकर यांनी सदर समस्या जाणून घेतल्या…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!