बारामती तालुक्यातील ‘माळेगाव’च्या साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र ढवाण पाटील यांची निवड
पाच वर्षांत चौघांना संधी

बारामती तालुक्यातील ‘माळेगाव’च्या साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र ढवाण पाटील यांची निवड
पाच वर्षांत चौघांना संधी
बारामती वार्तापत्र
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र ढवाण-पाटील (बारामती) यांची शुक्रवारी (ता. २४) बिनविरोध निवड झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून श्री.ढवाण कार्यरत आहेत.
मावळते उपाध्यक्ष तानाजी नामदेव देवकाते (रा. मेखळी) यांनी आपल्या पदाचा ठरवून दिलेल्या मुदतीत राजीनामा दिला होता. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी तथा बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे, अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांच्या अधिपत्याखाली वरील निवडणूक पार पडली.
माळेगाव कारखान्याचे सर्वेसर्वा व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार वरील निवडणूक बिनविरोध होण्यासाठी संचालक मंडळाने सहकार्य केले. याआगोदर उपाध्यक्ष पदावर मावळते उपाध्यक्ष श्री. देवकाते यांच्यासह पावणे पाच वर्षांत चौघांना संधी मिळाल्याची नोंद आहे.
त्यामध्ये माजी उपाध्यक्ष व संचालक तानाजी तात्यासाहेब कोकरे, बन्सीलाल विलास आटोळे, सागर अशोक जाधव यांचा समावेश आहे. विशेषतः उपाध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम संपताच त्याच संचालक मंडळाच्या बैठकीत कामगार संचालक म्हणून चंद्रकांत किसन जाधव (माळेगाव) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
संभाजी होळकर, बाळासाहेब तावरे, संचालक रंजन तावरे, योगेश जगताप, मदनराव देवकाते, सुरेश खलाटे, तानाजी कोकरे, अनिल तावरे, संगीता कोकरे, अलका पोंदकुले, सागर जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.