स्थानिक

बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांनी गिरवले कृषी निर्यातीचे धडे

93 शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदविला.

बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांनी गिरवले कृषी निर्यातीचे धडे

93 शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदविला.

बारामती वार्तापत्र 

महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेतून शेतकरी उत्पादक ते कृषि निर्यातदार या प्रशिक्षणाचे आयोजन बुधवारी एमसीसीआयए, पुणे येथे करण्यात आले.

या प्रशिक्षणाचे उद्घाटन आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे आणि एमसीसीआयए, पुणे चे सहाय्यक संचालक शंतनू जगताप यांच्या हस्ते झाले.

प्रशिक्षणात शेतीमाल निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीमाल पिकाविताना करावयाच्या उपाययोजना, शेतीमालाला असलेल्या निर्यात संधी, शेतीमालाचे विपणन व ब्रँडिंग, निर्यात प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे, शेतीमालाचे प्रमाणीकरण करणे, कृषि निर्यात अर्थ व्यवस्थापन व कृषि निर्यात योजनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षण दिलेल्या शेतकऱ्यांना यापुढील काळात वेळोवेळी शेतीमाल निर्यातीबाबत मार्गदर्शन करून तरुण युवा उद्योजक तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आत्माचे प्रकल्प संचालक श्री. साबळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी बारामती तालुक्यातील 93 शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदविला.

कार्यक्रमास एमएसएमबी चे व्यवस्थापक सतीश वऱ्हाडे, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचे सल्लागार .गोविंद हांडे, विपणन व ब्रँडिंग विशारद नंदिता खैरे, विक्रमशीला आयात निर्यात कंपनीचे संचालक धनश्री शुक्ला, तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल , आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्वजीत मगर , गणेश जाधव, ऐश्वर्या वाघ,विविध शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सेंद्रिय शेती करणारे शेतकरी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram