स्थानिक

क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक करणाऱ्या चालक, मालकासह कारखान्यावर कारवाई करावी : रिपाइं चे निवेदन.

तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशा इशारा

क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक करणाऱ्या चालक, मालकासह कारखान्यावर कारवाई करावी : रिपाइं चे निवेदन.

तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशा इशारा

बारामती वार्तापत्र

अवैधपणे क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक करणारे चालक,मालक संबंधित कारखान्यावर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे याबाबतचे लेखी निवेदन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना रिपाइं चे शहराध्यक्ष अभिजित कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली रिपाइं (आठवले) शिष्ट मंडळामार्फत आज देण्यात आले.

यामध्ये प्रामुख्याने क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करणारे चालक-मालक संबंधित कारखाने यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत. ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना प्रकाश परिवर्तक (रिफ्लेक्टर रेडियम) बसवावेत. अपघात झाल्यास ऊस वाहतूक करणारे चालक-मालक संबंधित कारखानदार यांना जबाबदार धरून यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. ऊस वाहतूक करणारी वाहने निष्काळजीपणे रस्त्यांवर उभी करणारे अथवा पार्किंग करणारे चालक-मालक संबंधित कारखानदार यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) बारामती मार्फत आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशा इशारा लेखी पत्राद्वारे देण्यात आले.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे शहराध्यक्ष अभिजित कांबळे,पुणे जिल्हा सचिव सुनील शिंदे, पुणे जिल्हा युवक सरचिटणीस रविंद्र (पप्पू) सोनवणे, संजय वाघमारे,तालुका सरचिटणीस मोईन बागवान,सामाजिक कार्यकर्ते
शुभम चव्हाण उपस्थित होते.

Related Articles

Back to top button