बारामती तालुक्यातील सोरटेवाडीत;पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद; तरुणाचा खून
दोघांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे.

बारामती तालुक्यातील सोरटेवाडीत;पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद; तरुणाचा खून
दोघांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील सोरटेवाडी गावचे हद्दीत पैशाच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरून तरुणाचा धारदार हत्यार यांनी खून केल्याची घटना शनिवारी (दि. 5) रात्री अकराच्या सुमारास घडली रोहित गाडेकर (वय 27) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी माहिती देताना सांगितले की, रोहित याचा खून पैशाच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरून झाला असून याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. रोहित याच्या कुटुंबीयांकडून फिर्याद दाखल करून घेतली जात आहे.
शनिवारी मध्यरात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सोरटेवाडी ग्रामपंचायत हद्दतील कुलकर्णी चारी ते शेंडकरवाडी रस्त्या नजीक ही घटना घडली. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील प्रक्रिया सुरू केली या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदणीचे काम सुरू आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही भेट दिली.