कोरोंना विशेष
बारामती तालुक्यातील १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह.
ग्रामीण भागातील चार व शहरी भागातील १४ असे एकूण १८ रुग्ण आज पॉझिटिव्ह आलेले आहेत.

बारामती तालुक्यातील १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह.
ग्रामीण भागातील चार व शहरी भागातील १४ असे एकूण १८ रुग्ण आज पॉझिटिव्ह आलेले आहेत.
बारामती वार्तापत्र
प्रतीक्षेत असलेल्या २१ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामती तालुक्यातील १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यामध्ये बारामती शहरातील १४ व ग्रामीण भागातील ५ रुग्णांचा समावेश आहे.
ग्रामीण भागामध्ये डोरलेवाडी येथील एक रुग्ण बर्हाणपूर येथील एक रुग्ण, इंदापूर येथील एक रुग्ण व गुणवडी येथील दोन रुग्ण समावेश आहे.
बारामती शहरांमधील प्रगती नगरतील दोन रुग्ण ,महादेव मळा येथील दोन रुग्ण, तांदूळवाडी येथील एक रुग्ण ,रुई येथील चार रुग्ण, आमराई येथील एक रुग्ण, कृषी देवता नगर येथील रुग्णाच्या संपर्कातील एक रुग्ण, खंडोबा नगरमधील एक रुग्ण ,हरिकृपा नगर येथील एक रुग्ण व शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील एकूण रुग्ण संख्या २११ झालेली आहे.