बारामतीतील सोळा हॉस्पिटल शासनाने केली अधिग्रहित !
कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येवरून प्रशासनाने घेतला निर्णय

बारामतीतील सोळा हॉस्पिटल शासनाने केली अधिग्रहित !
कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येवरून प्रशासनाने घेतला निर्णय
बारामती वार्तापत्र
थंडावलेला कोरोना पुन्हा डोके वर काढत असताना बारामतीतही रुग्णांची संख्या पन्नाशी पर्यंत वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने बारामतीतील खाजगी हॉस्पिटल अधिग्रहीत केली आहेत
वाढते रुग्ण पाहता खाजगी हॉस्पिटल ची गरज पडू शकते त्या धर्तीवर रुग्णांना व्यवस्थित सेवा मिळण्यासाठी बारामतीतील सोळा खाजगी दवाखाने प्रशासनाने अधिग्रहित केले आहेत.
अधिग्रहीत केलेल्या बारामतीतील दवाखान्यांमध्ये जगन्नाथ हॉस्पिटल, शांताबाई देशपांडे हॉस्पिटल ,लाईफ लाईन हॉस्पिटल ,पवार हॉस्पिटल, गावडे हॉस्पिटल ,श्री चैतन्य हॉस्पिटल, श्री हॉस्पिटल, संचित हॉस्पिटल ,मेहता हॉस्पिटल ,ओंकार हॉस्पिटल ,भाग्यजय हॉस्पिटल, शिवनंदन हॉस्पिटल, देवकाते हॉस्पिटल ,आरोग्य हॉस्पिटल ,गोरड हॉस्पिटल ,खोमणे हॉस्पिटल अशी सोळा खाजगी हॉस्पिटल अधिग्रहित करण्यात आल्याचा आदेश प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिला आहे.