बारामती तालुक्यात तीन गावांमध्ये सर्व्हे; ३२ हजारांमधून आतापर्यंत आढळले ५२ कोरोनाग्रस्त.
जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या सर्वेक्षणास भेट देऊन पाहणी केली.
बारामती तालुक्यात तीन गावांमध्ये सर्व्हे; ३२ हजारांमधून आतापर्यंत आढळले ५२ कोरोनाग्रस्त
.बारामती वार्तापत्र
आज बारामती तालुक्यातील ३ गावामधील सर्वात जास्त covid चे रुग्ण सापडणारे माळेगाव, पणदरे व गुणवडी या गावांमध्ये आरोग्य विभाग, पंचायत समिती विभाग,महसूल विभाग व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने गावातील लोकांना विश्वासात घेऊन ३२ हजार लोंकाचा घरोघरी जाऊन सर्वे पल्स ऑक्सिमिटर व थर्मल स्कॅनर च्या साह्याने एकूण १६० टीम मध्ये ३२० कर्मचारी व १६० स्वयंसेवक (गावातील ) यांनी तपासणी केली असता ३३२ नागरिक संशयित सापडले. त्याची जागेवरच antizen Test केली असता त्यातील ५२ नागरिक कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आले. त्याना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बारामती तालुक्यात महसूल, आरोग्य व ग्रामविकास विभागाच्या संयुक्त अॅक्टीव्ह सर्व्हे मध्ये आतापर्यंत ३२ हजार लोकांचे सर्वेक्षण झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. आज झालेल्या सर्वेक्षणामुळे गावागावात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत हे सिध्द झाले असून आता सर्वच गावांमध्ये रॅपीड अॅंटिजेन चाचण्या प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत करण्याची व तशा प्रकारची शिबीरेच घेण्याची गरज असल्याचे सिध्द झाले आहे.
संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पणदरेमध्ये आढळलेल्या ७१ संशयितांच्या रॅपीड अॅंटिजेन चाचण्या गावातच घेण्यात आल्या. त्यामध्ये १८ कोरोनाबाधित आढळले आहेत. अजूनही तेथे कोरोनाची रॅपीड अॅंटीजेन चाचणी सुरू आहे. आणखी ४० हून अधिक लोकांची तपासणी सुरू असल्याची माहिती डॉ. खोमणे यांनी दिली.
माळेगावमध्ये जवळपास २० हजार लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. तेथे १२० हून अधिक संशयित आढळले, त्यापैकी ८० जणांची चाचणी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पूर्ण झाली असून त्यामध्ये २० जण कोरोनाबाधित आढळले आहेत. अजूनही तेथे कोरोनाची रॅपीड अॅंटीजेन चाचणी सुरू आहे.
गुनवडीमध्ये दुपारपासून सर्वेक्षण सुरू झाले. तेथे संशयित आढळलेल्या ४५ जणांची आतापर्यंत चाचणी पूर्ण झाली असून तेथेही ८ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. अजूनही तेथे चाचणी सुरू आहे.
५० कुटुंबामागे एक पथक अशा पध्दतीने हे सर्वेक्षण झाले. यामध्ये शिक्षक, आरोग्य खात्याचे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे, जिल्हा परीषद सदस्या रोहिणी तावरे आदींसह स्थानिक पदाधिकारी, गावचे सरपंच, सदस्य यामध्ये सहभागी होते. जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या सर्वेक्षणास भेट देऊन पाहणी केली.