बारामती तालुक्यात पंधरा जण कोरोना.
शहरातील विद्यमान नगरसेवकांचा मुलगा सुद्धा कोरोना बाधित झाल्याने त्याच्या संपर्कातील अनेकजण धास्तावले आहेत.
बारामती वार्तापत्र
आज रविवार ९ ऑगस्ट रोजी बारामती तालुका व शहर मधील कोरोना आकडेवारी वाढत आहे
बारामतीत कोरोनाचा प्रसार आजही कायम राहिला, आज देखील सलग दुसऱ्या दिवशी १५ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत, गेल्या चार दिवसांमध्ये बारामती तालुक्यात तब्बल पन्नास जणांना कोरोनाची बाधा झाली आहे, दरम्यान रात्री अत्यवस्थ असलेल्या कोरोनाग्रस्ताचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा कोरोनाग्रस्त एका माजी खासदार यांचा पुतण्या आहे.
बारामती मध्ये आज पर्यंत २५१ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत, १०० पर्यंतचा कोरोनाबाधितांचा आकडा गाठायला बारामतीला जवळपास चार महिने लागले, परंतु आता २५० चा टप्पा गाठायला अवघ्या महिनाभराचाच कालावधी लागला. सध्या प्रकारे दररोज किमान दहा पर्यंत कोरोना रुग्ण आढळत आहेत, त्याचा विचार करता येत्या काही दिवसात बारामतीला सारी व कोरोनासाठी स्वतंत्र मोठी हॉस्पिटल्स लागतील अशी स्थिती आहे.
कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णाचा रात्री खाजगी हॉस्पिटलमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. हा कोरोनाचा बारामतीतील अठरावा बळी ठरला. आज बारामती तालुक्यात पंधरा जण कोरोना बाधित आढळले असून एक जण ग्रामीण भागातील व १४ जण शहरातील आहेत. १०१ संशयित नमुन्यांमध्ये नऊ अद्याप प्रतीक्षेत आहेत तर ७७ जण निगेटिव्ह आढळले आहेत.
शहरातील विवेकानंद नगर येथील 30 वर्षीय महिला, धुमाळवाडी येथील २९ वर्षीय पुरुष, प्रगतीनगर येथील 10 वर्षाचा मुलगा, वसंतनगर येथील 40 वर्षे पुरुष व 30 वर्षीय महिला, हरिकृपानगर येथील 58 वर्षीय महिला, मुजावरवाडा येथील 47 वर्षीय पुरुष, म्हाडा कॉलनी येथील 36 वर्षीय पुरुष, ढेकळवाडी येथील खताळपट्टा येथील 38 वर्षीय पुरुष, एमआयडीसीमधील 60 वर्षीय पुरूष, भोई गल्ली येथील 65 वर्षीय महिला व 40 वर्षीय पुरुष, भोई गल्ली येथील 11 वर्षीय मुलगा व 70 वर्षीय पुरुष व इंदापूर रोड येथील 35 वर्षीय पुरुष रुग्णास कोरोना ची बाधा आढळली आहे.