बारामती तालुक्याने कोरोना पॉझिटिव्ह चे शतक पार केले.
आज 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह.
बारामती तालुक्याने कोरोना पॉझिटिव्ह चे शतक पार केले.
आज 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह.
बारामती:वार्तापत्र
बारामतीत काल तपासणीसाठी पाठवलेल्या ५९ पैकी ४२ जणांचा अहवाल प्राप्त झाला आहे. यातील तब्बल ११ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. तर अद्याप १७ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
बारामतीत काल ५९ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. यातील ११ जणांना कोरोनाची लागण झाली असून अद्याप १७ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. काल आढळलेल्या गुरुकुल सोसायटी शिवनगर येथील रुग्णाच्या संपर्कातील तीन जण, जामदार रोड कसबा येथील रुग्णाच्या संपर्कातील तीन जण, मुक्ती अपार्टमेंट कसबा येथील एक, खंडोबानगर दत्त मंदिराजवळ येथील दोन, मारवाड पेठ येथील एक आणि ख्रिश्चन कॉलनीतील एक असे एकूण ११अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.
बारामती शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे आता प्रशासन नेमक्या काय उपाययोजना करणार याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे..