बारामती ते इंदापूरमार्गे बार्शीकडे निघालेल्या बसमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल

बारामती ते इंदापूरमार्गे बार्शीकडे निघालेल्या बसमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल
बारामती वार्तापत्र
राज्यात अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सोलापूर जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. बारामती ते इंदापूरमार्गे बार्शीकडे निघालेल्या बसमध्ये प्रवासादरम्यान अल्पवयीन मुलीला एका अनोळखी युवकाने त्याचे मोबाइलमधील पॉर्न व्हिडिओ दाखवून अश्लील चाळे करत विनयभंग केल्याची फिर्याद अल्पवयीन मुलीने बार्शी शहर पोलिसात दिली आहे.
रमेश सुब्राव बनसोडे (रा. भीमनगर, धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादीनुसार अल्पवयीन मुलगी आई वडिलासोबत गावी जाण्यासाठी बार्शीकडे येणाऱ्या बसमध्ये बसली होती. या बसमध्ये आरोपी अनोळखी युवकही प्रवास करत होता. अल्पवयीन मुलीच्या आई वडिलासोबत बोलू लागला. त्या दरम्यान तो युवक अल्पवयीन मुलीकडे वेगळ्या नजरेने पाहत जवळीक साधत असल्याचे पीडिताच्या लक्षात आले.
दरम्यान जैन मंदिर बार्शी येथे एसटी बस आल्यानंतर तो संशयित आरोपी त्या अल्पवयीन मुलीजवळ जाऊन बसला व त्याचे मोबाइलमधील पॉर्न व्हिडिओ अल्पवयीन मुलीला दाखवले. अश्लील चाळे करू लागला. त्या दरम्यान अल्पवयीन पीडिताने घडलेली घटना आई-वडिलांना सांगितली. त्या संशयित युवकाने त्याचे नाव रमेश सुब्राव बनसोडे असे सांगितले असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याचे विरुद्ध पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बस थेट पोलिस ठाण्यातच नेली. अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांनी त्या युवकास पकडले. त्याच्याकडून मोबाइल काढून घेतला. या वेळी सोबतच्या अन्य प्रवाशांनीही मदत केली. त्याला पकडून बस बार्शी शहर पोलिस स्टेशनला आणली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
हे सुद्धा वाचा : कराडमधील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; तब्बल ‘इतक्या’ महिलांची केली सुटका
राज्यात अत्याचाराचे प्रमाण वाढले
गेल्या काही दिवसाखाली फेसबुकवर झालेली ओळख एका महिलेला चांगलीच महागात पडली. ओळखीचा फायदा घेऊन या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तरूणाने अत्याचार केला. आरोपीने महिलेला घटस्फोट झाल्यानंतर ‘तुझ्यासोबत लग्न करेल’, असे आमिष दाखवून अत्याचार केला. याबाबत खामगाव शहर पोलिसांनी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. खामगाव सनी पॅलेसस्थित आशिष गीते (वय 26) याने एका 24 वर्षीय विवाहितेचा फेसबुकवरील ओळखीचा फायदा घेत तिला बोलाविले व तिला मोटरसायकलवर बसवून शेगाव रोडने सनशाईन कॅफेवर नेले. त्या ठिकाणी तुझ्यासोबत फारकती झाल्यानंतर लग्न करेन, असे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकारानंतर ‘तू माझ्यासोबत फोनवर बोलू नको’, असे म्हणून पीडित विवाहितेचा नंबर ब्लॉकमध्ये टाकला. अशा तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.