गेल्या दोन दिवसात बारामतीच्या कोरोना पाॅझिटीव्ह पेशंट मध्ये लक्षणीय घसरण.
दि. २४ रोजी दिवसभरात बारामती 20 जण कोरोना बाधितबारामती शहरात एकुण २० व ग्रामिण भागात १४ जण कोरोना संक्रमीत अढळून आले होते.आणि काल दि. २५ रोजी घेतलेल्या नमुन्यांपैकी बारामती दिवसभरात फक्त चार जण कोरोना बाधित शहरात फक्त १ आणि ग्रामिण भागातील फक्त ३ जण कोरोना संक्रमीत अढळून आले आहेत.

गेल्या दोन दिवसात बारामतीच्या कोरोना पाॅझिटीव्ह पेशंट मध्ये लक्षणीय घसरण.
दि. २४ रोजी दिवसभरात बारामती 20 जण कोरोना बाधितबारामती शहरात एकुण २० व ग्रामिण भागात १४ जण कोरोना संक्रमीत अढळून आले होते.आणि काल दि. २५ रोजी घेतलेल्या नमुन्यांपैकी बारामती दिवसभरात फक्त चार जण कोरोना बाधित शहरात फक्त १ आणि ग्रामिण भागातील फक्त ३ जण कोरोना संक्रमीत अढळून आले आहेत.
बारामती वार्तापत्र
दि. 24 ऑक्टोबर रोजी दिवसभरात बारामती शहरातून 06 तर ग्रामीण भागातून 14 रुग्ण असे मिळून 20 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
79 जणांचे rt-pcr नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 09 व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत नाही. इतर तालुक्यात तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला आहे. 43 रुग्णांची अॅन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 07 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत. काल दिवसभरात बारामतीत एकूण 20 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे. बारामतीत 4 हजार 059 रुग्ण असून, बरे झालेले 3 हजार 796 आहे तर मृत्यू झालेले एकशे दहा आहेत.
तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत rt-pcr 14 जणांचे नमुने घेण्यात आले त्यापैकी 04 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत.
दि. 25 ऑक्टोबर रोजी दिवसभरात बारामती फक्त चार जण कोरोना बाधित शहरातून 01 तर ग्रामीण भागातून 03 रुग्ण असे मिळून 04 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
11 जणांचे rt-pcr नमुने घेण्यात आले होते त्यापैकी एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळुन आले नाहीत व एकही रुग्ण प्रतिक्षेत नाही. इतर तालुक्यात एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला आहे. 20 रुग्णांची अॅन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 03 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत. काल दिवसभरात बारामतीत एकूण 04 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे. बारामतीत 4 हजार 063 रुग्ण असून, बरे झालेले 3 हजार 796 आहे तर मृत्यू झालेले एकशे दहा आहेत.
तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत rt-pcr 02 जणांचे नमुने घेण्यात आले त्यापैकी 01 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय रॅपीड अंन्टिजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये मेखळी येथील 65 वर्षीय पुरुष, बारामतीतील 32 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आठवण आले आहेत
बारामती तालुक्यातील मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड तपासणीत माळेगाव येथील शिवनगर सहकारी साखर कारखाना स्थळावरील 53 वर्षीय महिला रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तामध्ये बारामतीतील जगताप वस्ती येथील साठ वर्षीय पुरुष रूग्ण कोरोना बाधित आढळून आला आहे.
पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या कमी होते आहे असे जरी दिसत असले तरी नागरीकांनी काळजी घेण्याची गरज आहे.