गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव मतदारसंघात दोन हत्येच्या घटनांनी हादरला
राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सचिन जाधव यांची हत्या

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव मतदारसंघात दोन हत्येच्या घटनांनी हादरला
राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सचिन जाधव यांची हत्या
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघ बुधवारी हत्येच्या दोन घटनांनी हादरला. पहिल्या घटनेत आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे लेबर कॉन्ट्रॅक्टर सचिन जाधव यांची हत्या झाल्याचं समोर आलेला आहे. तर दुसऱ्या घटनेमध्ये द्रोपदाबाई गिरे यांचा मृतदेह डोक्यावर इजा झाल्याच्या अवस्थेत आढळून आलेला आहे. हत्येच्या या दोन घटनांमुळे आंबेगाव तालुका हादरुन गेलाय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे लेबर कॉन्ट्रॅक्टर सचिन जाधव यांची पैशाच्या देवाणघेवाणीतून हत्या झाल्याचं समोर आलं आहे. मंगळवारी रात्री ही हत्या करण्यात आलीय. मयत सचिन जाधव हे घरी न आल्याने याच्या नातेवाइकांनी मंचर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. आरोपी बाळशिराम थिटे आणि विजय सूर्यवंशी यांच्याशी मयत सचिन जाधव याचे पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन मोठा वाद झाला होता. मयत सचिन जाधव हे दिलेले पैसे परत करत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून यांच्यात वाद सुरु होता.