अवैद्य दारू विक्रेत्यांवर कारवाई करा ; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अधिकाऱ्यांना भरसभेत आदेश
कायमस्वरूपी बंद करा

अवैद्य दारू विक्रेत्यांवर कारवाई करा ; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अधिकाऱ्यांना भरसभेत आदेश
कायमस्वरूपी बंद करा
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील अनेक गावात राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनेक जण दारूबंदी संदर्भात निवेदन देत असतात, रविवार अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर होते, मेखळी याठिकाणी उद्घाटनासाठी पवार हे आले होते.
उद्घाटनानंतर सभेमध्ये एका महिलेने गावात मोठ्या प्रमाणात दारू विक्री सुरू असल्याचे गा-हाणे मांडून कारवाईसाठी त्यांना साकडे
घातले.
यावर अजित पवार यांनी पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. मेखळी गावात दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे गोरगरीब, बाराबलुतेदार आणि महिलांना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे महिलेने दारू बंद करण्याच्या मागणीचे निवेदन पवारांना दिले. अजित पवार यांनी निवेदन पाहताच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना दारूबंदीबाबतचे आलेले निवेदन देत बारामती
तालुक्यात कुठेही दोन नंबरचे धंदे बेकायदेशीर दारू विकली जाते. ती कायमस्वरूपी बंद करा. त्यांच्यावर ताडा लावा, काय कारवाई करायची ती करा.
पण बारामती तालुक्यातील कायमस्वरूपी दारू बंद करा.पवारांना दिले. अजित पवार यांनी निवेदन पाहताच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना दारूबंदीबाबतचे आलेले निवेदन देत बारामती तालुक्यात कुठेही दोन नंबरचे धंदे बेकायदेशीर दारू विकली जाते. ती कायमस्वरूपी बंद करा. त्यांच्यावर ताडा लावा, काय कारवाई करायची ती करा. पण बारामती तालुक्यातील कायमस्वरूपी दारू बंद करा.