बारामती, दौंड,इंदापूर, तालुक्यात 1 जून पासून रिक्षा सुरू होणार.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर काळजी घेणार: रिक्षा संघटना..
बारामती,दौंड,इंदापूर तालुक्यात 1 जून पासून रिक्षा सुरू होणार.
१ जून पासून बारामती, इंदापूर, दौन्ड मध्ये सशर्त रिक्षा चालू होणार आहेत या संदर्भात गुरुवार दि.28 मे रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय (R.T.O) बारामती याठिकाणी प्रशांत सातव यांच्या विनंतीला मान देऊन बारामती, इंदापूर, दौन्ड येथील सर्व रिक्षा चालक-मालक संघटना पदाधिकारी यांची बैठक प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी. मा.धायगुडे साहेब, मा.साखरे साहेब, मा. मुळे साहेब, मा.शिंदे साहेब, मा.प्रशांत (नाना) सातव, डॉ. भीमराव मोरे सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.यावेळी रिक्षा चालक यांनी कोरोना विषयक घ्यावयाची काळजी आणि नियम सर्वांना समजावून सांगीतले आणि त्यासंदर्भाच विस्तृत पत्रक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रकाशित केले आहे त्या पत्रकाच्या प्रति श्री.प्रशांत (नाना) सातव मित्र परिवार यांच्या वतीने बारामती, इंदापूर दौन्ड मधील सर्व रिक्षा चालकांना देण्यात आल्या. प्रशासन आपणास सहकार्य करीत आहे आपण देखील सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून आपण देखील एक जबाबदार नागरिक असल्याचे दर्शन घडवूया अशी विनंती माझ्या सर्व रिक्षा चालक बांधवांना करण्यात आली.. आम्ही सर्व नियमाचे पालन करून काळजी घेऊ असे आश्वासन माझ्या रिक्षा संघटनाच्या पदाधिकारी बांधव यांनी यावेळी दिले प्रवासी बांधवानि सुद्धा काळजी घ्यावी व सहकार्य करण्याचे आव्हान रिक्षा संघटना च्या वतीने करण्यात आले आहे.