“बारामती नगरपरिषदद्वारा माझी वसुंधरा अभियानांतर्गत पथनाट्य सादर”
स्टेट बँक ऑफ इंडिया बारामती यांच्या सौजन्याने
“बारामती नगरपरिषदद्वारा माझी वसुंधरा अभियानांतर्गत पथनाट्य सादर”
स्टेट बँक ऑफ इंडिया बारामती यांच्या सौजन्याने
बारामती वार्तापत्र
भगिनी मंडळ बारामती यांचे द्वारा आयोजित, बारामती नगरपरिषद कार्यालय यांच्या सहकार्याने आणि स्टेट बँक ऑफ इंडिया बारामती यांच्या सौजन्याने महिला सक्षमीकरणाकरीता आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत सायकल वापरास प्रोत्साहन देण्याकरिता आणि प्रदूषणमुक्त व हरित बारामती या उद्दिष्ट्यपूर्तीच्या दिशेने वाटचाल म्हणून रविवार दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी ठीक ७ वाजता रेल्वे ग्राउंड शेजारील पूनावाला गार्डन येथून सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते . सदरील सायकल रॅली पुनावाला गार्डन -पियाजो कंपनी- पूनावाला गार्डन या मार्गावरुन ५ किमी ,१० किमी , १५ किमी, २० किमी , २५ किमी अशा विविध टप्प्यांमध्ये पार पडली.
त्याचबरोबर सायकल व ई वेहिकल वापरास प्रोत्साहन देण्याकरिता अनेकांत मॅनेजमेंट महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने Solution on pollution हे पथनाट्य सादर करण्यात आले .
यामध्ये कॉलेजमधील युवतींनी संगीतमय गाणे,नृत्य व विविध पोस्टर्सच्या माध्यमातून हवा प्रदूषणावर कशी मात करता येऊ शकेल
याचे उत्कृष्टरित्या सादरीकरण केले. याकरिता सुनेत्रवाहिनीनी देखील त्यांचे विशेष कौतुक केले. तसेच पर्यावरण रक्षणाकरिता अशाच प्रकारच्या जनजागृती कार्यक्रमांची गरज बोलून दाखविली.
सदर कार्यक्रमास आदरणीय सौ. सुनेत्रावहिनी पवार अध्यक्षा- बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क, बारामती,सौ. शर्मिलावहिनी पवार, अध्यक्षा- शरयु फौंडेशन ,सौ. पौर्णिमा तावरे, नगराध्यक्षा बारामती नगर परिषद बारामती , सौ. सुनीता शहा मॅडम ,श्री. आबिद उर रेहमान – SBI उपमहाप्रबंधक ,श्री. जोरासिंग SBI सहाय्यक महाप्रबंधक , भगिनी मंडळाच्या सर्व सदस्या ,sbi बँकेचे आणि बारामती नगरपरिषदेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आदि मंडळी उपस्थित होते.